Top Post Ad

अरूणा प्रकल्पग्रस्तांचे 25 फेब्रुवारी रोजी अंबडपाल कार्यालयावर उपोषण, आक्रोश आंदोलन

सिंधुदुर्ग
अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार,जलसंपदा विभाग,आणि पुनर्वसन विभागांने  प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केलेली असुन अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा तात्काळ सुरु करा, धरणात बुडालेल्या घरांचे पंचनामे करा, आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या या व ईतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी अरुणा प्रकल्पग्रस्त २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबडपाल कुडाळ येथील प्रकल्प कार्यालया वर  उपोषण, आक्रोश आंदोलन करणार आहेत. या बाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता एम.एस. कदम यांना २२ फेब्रुवारी २०२१ रोजी देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप, महिला आघाडी सचीव आरती कांबळे,अभिषेक कांबळे आदिं चा या शिष्टमंडळात समावेश होता. 

४ जानेवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला होता. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे १३० घरां पैकी काही घरे पाण्याच्या बाहेर दिसु लागताच २ फेब्रुवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग अचानक बंद करण्यात आल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी अरुणा प्रकल्पाच्या पिचींग चे आणि कालव्याचे काम बंद पाडलेले आहे. गेले महिनाभर हे काम पंधरा वर्षात पहिल्यांदाच निर्णायकपणे प्रकल्पग्रस्तांनी बंद केले आहे. पाणी बंद तर काम बंद असा इशारा देत अरुणा प्रकल्पग्रस्तांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी वैभववाडी तहसिल कार्यालयावर केलेले लक्षवेधी आमरण उपोषण ही कमालीचे यश्स्वी झाले होते. 

२२ फेब्रुवारी २०२१ रोजी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,महिला आघाडी सचीव आरती कांबळे,अभिषेक कांबळे आदी पदाधीकार्यांनी नव्याने आलेले कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांची आंबडपाल येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थीतीमध्ये बंद केलेला पाण्याचा विसर्ग सुरु करा, बुडालेल्या घरांचे पंचनामे करुन नुकसान भारपाई द्या,पुनर्वसन गावठणात ठप्प असलेली नागरी सुवीधांची कामे पुर्ण करा, किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाण मागवली पुनर्वसन गावठणाला जोडा, कुंभारवाडी येथे श्रीसाईबाबा मंदीरासाठी स्वतंत्र भुखंड देऊन ताबा पावती द्या. या व इतर मागण्यांच्या पुर्तते साठी २५ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पाच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,महिला आघाडी सचीव आरती कांबळे,अभिषेक कांबळे यांनी दिली. 

दरम्यान पावने दोन वर्षा नंतर आम्हाला जिल्हाधिकारी मॅडम यांनी निवासी भुखंड बदलुन दिले आहेत.गेले एक महिना आमच्या भुखंडातील पत्राशेड , रस्ता , लाईट व संरक्षण भिंत इत्यादिंची मागणी करुन ही का दिली जात नाही. दोन हजार कोटी पेक्षा जादा निधी शासनाने दिलेला आहे जर पत्राशेड आणि संरक्षण भिंत तुम्हाला देता येत नसेल तर हा पैसा गेला कुठे असा सवाल महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचिता चव्हाण आणि महिला सचिव आरती कांबळे यांनी कार्यकारी अभियंत्यां समोर उपस्थित केला केला आहे. २५ तारखे पर्यन्त आमच्या भुखंडातील गैरसोय दुर केली नाही तर राॅकेलच्या कॅनसह आक्रोश आंदोलनात आम्ही दोघी सहभागी होणार आहोत पुढे घडणाऱ्या घटनेस आपण जबाबदार असाल असा इशारा आरती कांबळे व सुचीता चव्हाण यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com