महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीत 36 जिल्हे आहेत. मात्र काही दिवसांमध्ये यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यांमध्ये 22 नवीन जिल्हे व 49 नवीन तालुके निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. मागील सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून नव्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला. यामुळे ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव कळवण जिल्ह्याचा निर्मितीचा प्रस्ताव आहे
लातूर जिल्ह्यातील उदगीर ला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हे आहेत. उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट तालुक्यात यात समाविष्ट होतील तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल
नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीर मध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते उदगीर जिल्हा करताना साधारणता साठ किलोमीटर अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून चिमूर. गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी, जळगाव जिल्ह्यातून भुसावळ, लातूर जिल्ह्यातून उदगीर, बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई, नांदेड जिल्ह्यातून कीनवट, सातारा जिल्ह्यातून मानदेश, पुणे जिल्ह्यातून शिवनेरी, पालघर जिल्ह्यातून जव्हार. रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड, रायगड जिल्ह्यातील महाड, अशा या जिल्ह्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या