प्रमोद इंगळे यांच्या भेटीसाठी रामदास आठवले ठाण्यात

ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील आणि रिपब्लिकन पार्टीचे ठाण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद प्रल्हाद इंगळे यांच्या लहान भगिनी रेखा किशोर बनसोडे यांचे बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.  या दुखद प्रसंगी  केंद्रीय खासदार मंत्री रामदासजी आठवले 18 फेब्रुवारी रोजी ठाण्यात येऊन इंगळे परिवाराची भेट घेतली. सुमारे अर्धातास प्रमोद इंगळे यांच्या डॉ.आंबेडकर येथील राहत्या घरात आठवले यांनी इंगळे परिवाराच्या दुःखात सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र मुनसिपाल युनियनचे अध्यक्ष रवि शिंदे, डॉ.आंबेडकर रोड येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अश्विन कांबळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर ठाण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांचीही भेट घेऊन थोडक्यात ठाण्यातील घडामोडीची चौकशी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या