घराघरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकाचे वाटप

 ठाणे 
जंयती ही विचारांची व आदर्शाची व्हावी हाच आदर्श  जयहनुमान मित्रमंडळाने सावित्रीबाई फुले यांची पुस्तके देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे असे उद्गगार मंडळाने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले जंयती उत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी काढले.

 यावेळी अंनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर, अंनिस शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के, प्राथमिक शिक्षिकां  कांबळे मॅडम, गांगरकर गुरुजी, माजी सरपंच संजय गोवळकर, अंगणवाडी शिक्षिका किशोरी गायकवाड, अर्चना चिनकटे, माजी सरपंच स्मिता चिनकटे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुगंधा चिनकटे, माजी सरपंच स्मिता चिनकटे, आरोग्य  सेविका सारीका गोवळकर, आदर्श माता पुरस्कार प्राप्त सुलोचना गोवळकर, जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक मेंगडे, प्रिया बडबे, प्रकाश घाणेकर, राकेश मेंगडे, मनी वाईज अर्थिक सारक्षता केंद्र प्रमुख मधुकर माळचे, अनिस कार्यकर्ते शैलेश सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातील हेदली गाव हे पुरोगामी चळवळतील केंद्र समजले जाते. महापुरुषांच्या विचाराने चालणारे व त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून या गावाची वाटचाल सुरू आहे. महापुरुषांच्या जंयती  करणारे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. प्राथमिक शिक्षिका कांबळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे, त्यांनी जर शाळा काढली नसती तर मी शिकली नसती. या गावातील महिला सावित्रीबाई फुले यांच्या सारखा गणवेश परिधान करून केलेले  पाहून मी भारावून गेले. असा सावित्रीबाई फुले उत्सव सर्व गावांत होणे गरजेचे आहे 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रुती पाकतेकर  म्हणाले की, पुस्तकांनी मस्तक सुधारते ज्यांचे मस्तक सुधारते, ते  नतमस्तक कधी होत नाही. हेच काम जय हनुमान मित्र मंडळ हेदली यांनी केले आहे. या मंडळाने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख होणार पुस्तक भेट देऊन एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिस खेड कार्याध्यक्ष सचिन शिर्के म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री, स्त्रीयांना शिक्षण दिले. त्यामुळे आज शिकलेल्या स्त्रिया अनेक पदावर विराजमान झाल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, कलेक्टर,  झाल्या त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव संदिप बडबे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या