युनियनने सादर केलेल्या विविध मागण्या मान्य करणार असल्याचे ठामपा उपायुक्तांचे आश्वासन

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन यांच्या शिष्ठमंडळाची आज २५ जानेवारी रोजी झालेल्या चर्चेअंती  प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी)  घेण्यात येणारे लाक्षणिक उपोषण  मागे घेण्यात आले आहे. युनियनने सादर केलेल्या  विविध मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेत असल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. या चर्चेत  रविंद्र शिंदे, अध्यक्ष, सुरेश पाटीलखेडे कार्याध्यक्ष, प्रमोद इंगळे सरचिटणीस, प्रा.चंद्रभान आझाद खजिनदार, प्रभाकर जाधव चिटणीस, सुनिल चव्हाण उपाध्यक्ष व दिनेश वाटवे आदी सदस्य सहभागी झाले होते. 

गेले १० वर्षापासून चालु असलेल्या नियमबाह्य अनियमित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व पदोन्नती बाबत व प्रभारी अधिभार काही प्रमाणात कमी केलेत पण काहींचे करण्यात आले नाहीत ते त्वरीत काढण्याबाबत. मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली मेगा भरती त्वरीत करण्यात यावी. आऊटसोसिंग पध्दत बंद करावी. कॉन्ट्रक्ट बेसीसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे. कोविड-१९ मध्ये कर्मचाऱ्यांना युनियनच्या विनंतीवरुन परत घेण्यात आलेले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेमध्ये ७ वे वेतन लागु करण्यात यावा. वरील सर्व मागण्यांवर विस्तृत चर्चा होऊन सकारात्मक भुमीका घेण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने मा. विजयकुमार म्हसाळ सोो. उपआयुक्त (मु) यांनी यावेळी दिले. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad