भेदाभेद मुक्त मानवी समाजासाठी उपोषण, पूजा जया गणाई यांचे अनोखे आंदोलन

वाई
मानवी समाजातील जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश या आधारे होणारा भेद भाव दूर व्हावा म्हणून लोकजागृती करण्याच्या हेतूने वाई येथील मैत्रकूल मध्ये विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्य अध्यक्षा पूजा जया गणाई या तरुणीने उपोषण आरंभले आहे.२६ जानेवारी ते 30 जानेवारी (प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हुतात्मा दिन ) असे सलग पाच दिवस हे उपोषण चालणार आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या संस्था संघटना केवळ आपल्या हिताच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हा उपोषणाचा मार्ग अवलंबतात. मात्र आता संपूर्ण सामाजिक अभिसरण व्हावे यासाठी हे उपोषण होत असल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक मानवहितवादी कार्यकर्त्यांनी या उपोषणाला सहकार्य पाठिंबा दिला आहे. 

भेदभाव मुक्त मानव मोहिमेची ही सुरवात असून या उपोषणाला व मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी  चिरंजीवी राज्यकार्यवाह ऐश्वर्या तोडकरी,चिरंजीवी राज्यप्रवक्ता पुष्कर धुरी , चिरंजीवी सदस्य साई लवांडे, रितिका लोखंडे व विद्यार्थी भारती सदस्य दिव्या सनानसे, गंगा गुंडाइया यांनीही एक दिवसीय साखळी उपोषण केले आहे.जनता दल मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर यांच्या उपस्थिती आजच्या तिसऱ्या दिवसाच्या उपोषणाला सुरवात झाल्याची माहिती या  संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील, संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रणय घरत,संघटनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या श्रेया निकाळजे यांनी दिली

   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जनरल कामगार  युनियन ) चे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते आणि  परखंदी गावातले शिक्षक (जिल्हा परिषद शिक्षक) सचिन गाढवे,पो.उपनिरीक्षक संजय  मोटकर ,बोपर्डी गावातील  सामाजिक कार्यकर्ते भरत काळे आदी मान्यवरांनी उपोषण कार्यक्रमात उपस्थित राहून या मोहिमेला  पाठिंबा दर्शवला आहे.            वाई जवळच्या बोपरडी गावात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप यांनी मैत्रकूल या जीवन शिक्षण केंद्राची शाखा सुरू केली असून त्यात भेदभाव मुक्त मानव मोहिमेसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या