संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री

 पुणे:
भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता परिषदेचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.  संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून संबंधितांवर लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे अनिल देशमुख म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख आज पुण्यातील येरवडा कारागृहाची पाहणी करण्यासाठी आले होते.  भिडे व एकबोटे यांच्यावरील चार्जशीटचा प्रस्तावासह अनेक विषयांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. 

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावजवळ घडलेल्या हिंसाचारानंतर पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरात राहणाऱ्या अनीता सावळे यांनी 2 जानेवारीला पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सावळे यांच्या तक्रारीनुसार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिन्यांनी म्हणजे 14 मार्च रोजी मिलिंद एकबोटेंना अटक झाली. त्यानंतर एप्रिलमध्ये ते जामिनावर सुटले. मात्र संभाजी भिडे यांना या प्रकरणात अटक झालेली नाही. 

 आरोपी असलेल्या संभाजी भिडेंचं पुढे काय झालं? "शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर येत्या 15 ते 20 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे," असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यावेळी २०१८ला सांगितलं होतं. अद्यापही याच्यावर चार्जशिट दाखल करण्यात आलेली नाही.  त्यावेळेस पुढील 15 ते 20 दिवसांत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल," असं आश्वासन संदीप पाटील यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र भिडे यांना अजूनपर्यंत अटक का झाली नाही,  असा प्रश्न आंबेडकरी जनता विचारत आहे. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्यामुळेच हे गाजर दाखवण्यात येत आहे का अशी चर्चाही रंगली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या