दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळले


 पुणे :

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मार्चच्या राहुल डंबाळे यांनी केला आहे. दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. मार्च 2018 मध्ये भिडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी झाली नाही    भिडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्राया व्यक्तींना पुरावा दाखल करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच, भिडे यांच्याकडेही चौकशी केली नाही असं डंबाळे यांनी म्हटलंय.  

कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथील दंगलीची जगभरात चर्चा झाली होती. या दंगलप्रकरणात भिडे यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यांच्यावर केव्हाही कारवाई होई शकते असे संकेत नुकतेच गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. मात्र आरोपपत्रातून पोलिसांनी नावच बदलंल असल्याचा आरोप झाल्याने आता सरकार कुणाच्या पाठीशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान मागील आठवड्यात संभाजी भिडे हे शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी  समाधीस्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच शिक्रापूर पोलीस समाधीस्थळी आले आणि भिडेंना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव करण्यात आला.पोलिसांनी रोखल्यानंतर संभाजी भिडे त्या ठिकाणावरुन निघून शिरुर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेटले आणि पुण्याकडे रवाना झाले.

शनिवारी 9 जानेवारी रोजी रोजी  छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भिडे आले होते. याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समाधीस्थळी दाखल होऊन भिडे यांना वढू बुद्रुकला थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व घटनेची गोपणीय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याने या परिसरात भिंडेना थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA