ठाणे म.न.पा. गेल्या २८ वर्षापासून मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहे. ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर, महापालिका भ्रष्टाचार मुक्त करायची असल्यास शासनाकडुन प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कार्यरत असणे ठाण्यातील जनतेच्या अत्यंत हिताचे आहे. आज रोजी ठाणे महानगरपालिकेमध्ये झीरो इन्वेस्टमेंट फुल प्रॉफिट अशी म्हण प्रचलित झालेली आहे. ठाणे महानगरपालिका ही आज रोजी ३० लाख लोकसंख्या वास्तव्य करीत असल्याचे माहीत आहे. यांच्या सोयी-सुविधांकरिता म.न.पा. मध्ये शासनाचे वरीष्ठ अधिकारी कार्यरत असणे अत्यंत आवश्यक झालेली असल्याची बाब महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष सुरेश पाटीलखेडे यांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिली आहे..
याबाबत मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महानगरपालिकेचे स्थानिक अधिकारी / कर्मचारी हे लोकप्रतिनिधीच्या बरोबर हात मिळवणी करुन जनतेचा पैसा लुटण्याचेच काम करीत आहेत. अशी तक्रार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचेकडे असता, त्यांनी ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार ४१% प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मा. नंदलाल समितीची नियुक्ती केली होती. मात्र ठाणे महापालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचाराचे चौकशी करण्याचे अधिकार देऊन सध्दा आजपर्यंत ही भ्रष्टाचारी अधिकारी/ कर्मचारी लोकप्रतिनिधी यांचेवर आरोप असलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही? या उपर त्यावेळचे काही नगरसेवक ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता ते आज खासदारकी उपभोगत आहेत.
तरीही आज काही सुपारीबाज लोकप्रतिनिधी महासभेत प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी यांना ठाण्याची माहिती नसल्याचे खोटे आरोप करीत आहेत. त्यांना आपल्या मर्जीतील प्रस्तापित अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे शडयंत्र काम करीत असल्याचे समजते. विषेश म्हणजे ज्या अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता देखील नाही, असे म.न.पा. मधील सहाय्यक आयुक्त, उपायुक्त/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी होत आहे. जी काही पदोन्नती देण्यात येईल ती आकृतीबंदाचा आधार घेऊन दिली गेल्या पाहीजे. त्यासाठी शासनाबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करीत असल्याची माहितीही खेडेपाटील यांनी दिली..
गेल्या काही दिवसापुर्वी महाराष्ट्र शासनाने आपणांस केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे काही लोकप्रतीनिधी यांचेबरोबर असलेली हित संबंधीत अधिकारी यांची मुळ पदावर गच्छंती करण्यात आलेली आहे. ठाणे महानगर पालिकेमध्ये ठाणेकरांच्या पैशाची, राज्य शासनाकडुन आलेल्या निधीची, केंद्र सरकार यांचेकडून आलेल्या निधीची लुट करण्याचेच कट कारस्थान स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन सुरु आहे. प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी हेच ठाणेकरांना न्याय देऊ शकतात. ठाणे महापालिकेत शासनाकडुन प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी श्री. गणेश दशमुख आणि श्री. संजय हेरवाड़े अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी निपक्षपाती धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात. करीता आपण योग्य ती माहिती घेऊन लोकप्रतिनिधीची राजकीय खेळी त्वरीत थांबवावी आणि याबाबत ठाणे महानगरपालिकेला योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी खेडेपाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या