हुतात्मा दिनी आत्मक्लेश उपोषण करून ठाण्यात शेतकरी आंदोलनाला पाठींबा !

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शंभर पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले. तरीही दोन महिने आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार घडवून आणून शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्याचा घाट सत्ताधा-यांनी रचला.  त्याविरुद्ध निषेध करण्यासाठी महात्मा गांधी स्मृती दिनी ठाण्यात आत्मक्लेश उपोषणाला शेकडो ठाणेकरांनी पाठींबा दिल्याचे संयोजक जगदीश खैरालीया यांनी सांगितले.  २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार करणारे व शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कुटिल डाव रचणा-या शकुनीचा पर्दाफाश व्हावा या मागणीसाठी व शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांवर खोट्या केसेस करणारे दिल्ली पोलिस व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे महात्मा गांधी स्मृती दिनी 

देशभर उपोषण कार्यक्रम करण्यात  आले आहे. ठाण्यातील जन आंदोलनांची संघर्ष समिती तर्फे ३० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पासून एक दिवसाचे उपोषण/ आत्मक्लेश आंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता.  उपोषणात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे डॅा. संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, भास्कर शिगवण,  स्वराज अभियानचे सुब्रतो भट्टाचार्य, शुभकार्य चव्हाण,  गावठाण, कोळीवाडे व पाडे संवर्धन समितीचे डॅा. गिरीश साळगावकार, सुरेन कोळी, निशांत म्हात्रे, स्वराज इंडियाचे हेमंत शर्मा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, शोषित जन आंदोलनच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या निर्मला पवार, आयटकचे लिलेश्वर बनसोड,  युवक काँग्रेसचे प्रवीण खैरालिया,  व्यसनमुक्ती अभियानचे संजय धिंगाण, आदी दिवसभर आत्मक्लेश उपोषणात सहभागी  झाले होते.  आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विक्रांत चव्हाण,  श्रमिक मुक्ती दलाचे अविनाश कदम, म्युनिसिपल लेबर युनियनचे बिरपाल भाल, बाल्मिकी विकास संघाचे नरेश भगवाने, राजपाल मारोठीया, नरेश बोहित, इंटकचे सचिन शिंदे, संविधान जन जागृति मंचचे मकसूद खान, कुतबुद्दीन खान, तुशार बारशीकर आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या