चला व्यसनाला बदनाम करु या


 मंडणगड अनिसचा एक उपक्रम
NO WHISKEY NO BEER , HAPPY NEW YEAR , HAPPY NEW YEAR ll

खेड
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मंडणगड शाखा व कबीर कला क्रिडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनाला बदनाम करु या या उपक्रमाचे आयोजन   पिंपळे स्टेशनरी स्टोअर्स बाणकोट रोड येथे करण्यात आले होते. यावेळी मंडणगडचे गटविकास अधिकारी  भिंगारदेवे,गटशिक्षणाधिकारी कुचेकर सर, कृषी अधिकारी विशाल जाधव,विस्तार अधिकारी जगताप सर,प्राध्यापक डॉ.भारतकुमार सोलापुरे, नगरपंचायत बांधकाम सभापती आदेश मर्चंडे, उद्योजक दिपक घोसाळकर, संजय राणे, प्रवीण जाधव, शिक्षक पतपेढी संचालक शांताराम पवार,लेखक किशोर कासारे, शिक्षक नरेश गोरे, संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष  भरत सरपरे,कोषाध्यक्ष विजय अधिकार,  विदयार्थी मदत संघटनेचे अध्यक्ष राजेश इंगळे, दत्ता सापटे, पत्रकार सचिन माळी, श्री.जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! असा संदेश देऊन मंडणगड मधील नागरिकांना दूध पिण्यास देण्यात आले. आम्ही नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करु असा संकल्प करण्यात आला.यावेळी माध्यमाशी बोलताना अंनिसचे कार्यअध्यक्ष विजय डोईफोडे म्हणाले की, सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत तितक्याच उमेदीने आणि उत्कटतेने करीत असतो. आजच्या दिवशी समाजात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले जाते. कितेक तरुण दारूचा पहिला घोट यांच दिवशी घेत असतात आणि हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात. निकोप आणि सदृढ समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्त होणे ही  काळाची गरज आहे.

            यावेळी अंनिसचे प्रधान सचिव श्रीकांत जाधव म्हणाले की,  गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात पडत चाललेला दिसतो. तरूणाई मोठ्या प्रमाणावर या चंगळवादी चक्रात ओढली जातेय. गेल्या काही वर्षांमध्ये 31 डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक युवक-युवती 31 डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात. व्यसनाधीन होणे म्हणजे सारासारा विचार करण्याची शक्ती हरवून बसणे. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आम्ही करत आहोत. व्यसन मुक्त नवीन वर्षाच स्वागत केले पाहिजे.  या  अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA