Top Post Ad

वंचित बहुजन आघाडीच्या किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड,
आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले

मुंबई,
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात आले. राज्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, हिंगोली, भंडारा, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर, जालना, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवले. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. रात्रीपासूनच हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. केवळ शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत होते. मात्र आघाडी सरकार शेतकरीविरोधी असल्याने त्यांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रात्रीपासूनच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विषयक बिल रद्द करण्यात यावे, यासाठी लाखो शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली तसेच परिसरात आंदोलन करीत आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या कडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली. दिल्लीत शाईन बाग आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान बाग आंदोलन करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्यासाठी अनेक मुस्लीम संघटनांना वंचित बहुजन आघाडी ने पाठिंबा दिला होता. राज्यात २७ जानेवारी रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मुंबईतील नागपाडा परिसरात तर जिल्ह्याच्या प्रमुख  ठिकाणी हे आंदोलन केले जाणार होते. मात्र मुंबईत या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. अशाही परिस्थितीत हे आंदोलन यशस्वी करून दाखवायचे असा निश्चय वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र या आंदोलनाची धडकी आघाडी सरकारमध्ये भरली की काय म्हणूनच रात्री उशिरापर्यंत हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. देवनार, शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, नागपाडा, कांदिवली, वरळी, धारावी अशा विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात आली. हजारो कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले. 

आज सकाळी चांदीवली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ज्या बसने येणार होते त्या पाच बसेस व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांची ही दडपशाही होती. हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून आघाडी सरकार काम करीत होते. अशाही परिस्थितीत नागपाडा मध्ये आलेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने, आनंद जाधव, संजय मोहिते, अनिल वाकोडे, मकरंद कांबळे अशा हजारो कार्यकर्त्यांना नागपाडा भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यामुळे काहीसा तणाव या भागांमध्ये निर्माण झाला होता. वंचितचे कार्यकर्ते नागपाडा परिसरात पोहोचू नये म्हणून पोलिसांनी रात्रीपासूनच अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावून कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत कार्यकर्त्यांनीही आंदोलन यशस्वी करून दाखवले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी झाल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

 वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परवानगी नाकारून या आघाडी सरकारने आपण शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. हजारो कार्यकर्त्यांना अटक केल्याने वंचित बहुजन आघाडीने या कारवाईचा निषेध केला आहे. असे असले तरी राज्यात मात्र या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणे हे आंदोलन यशस्वी करून दाखविण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com