उद्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे  आवाहन

ठाणे 
 एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 158 आहे. त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी 2021 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

             या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार  आहे. एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त्‍ न झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 5 आहे. पुर्णत:बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 8 आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जांगापैकी जांगासाठी वैध नामनिर्देशपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतीची संख्या 2 आहे. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्राम पंचायतीची संख्या 143 आहे. एकुण जागांची संख्या 1472 आहे. एकही वैद्य नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 59 आहे. माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैद्य नामनिर्देशनपत्र उरलेल्या बिनविरोध निवडणूक झालेल्या जांगाची संख्या 417 आहे.त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी 2020 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.        

ठाणे पुरुष 5829 स्त्री 5159 आहेत.कल्याण पुरुष मतदार-31147 व स्त्री मतदार 27137 व  इतर 1 आहे.अंबरनाथ पुरुष मतदार-24449 व स्त्री मतदार-22563 आहेत.भिवंडी पुरुष मतदार-69040 व  स्त्री मतदार-61831  व इतर 1  आहे. मुरबाड पुरुष मतदार-24562 व  स्त्री मतदार-22729 आहेत.शहापुर पुरुष मतदार-5453  व  स्त्री मतदार-5061 आहेत. ग्रामपंचायतीची संख्या 158 आहे.एकूण प्रभाग संख्या 526 आहे.सदस्य संख्या 1472 आहे.पुरुष-160480,स्त्री-144480, इतर-2  एकूण मतदार 304962 आहे.


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA