Top Post Ad

ट्रॅक्टर मोर्चाच्या दिवशी चार शेतकरी नेत्यांना गोळ्या झाडण्याची सूचना ?

काळा कायदा हटाव आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर आता जीव वाचवण्याचे संकट उभे राहिले आहे. आंदोलनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना खलिस्तानवादी संबोधून आंदोलनाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी आंदोलनात घुसलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी जय खलिस्तानच्या घोषणा देऊन आंदोलन फोडण्याचा प्रयत्नही केला होता. यानंतर आता ट्रॅक्टर मार्च होऊ न देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. ज्यामध्ये आधीच शेतकऱ्यांना घरातूनच बाहेर पडू दिले जात नाही. इतकेच नव्हे तर अनेकांना नजरबंद केल्याचेही शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. तसेच आंदोलनात हिंसाचाराचा कट रचल्याचा दावा  शेतकरी संघटनांनी केला आहे. शुक्रवारी रात्री शेतकरी आंदोलनाच्या सुरक्षा समितीने सिंघु सीमेवरुन एका व्यक्तीला अटक केली. शेतकरी नेत्यांनी त्याला माध्यमांसमोर आणले, जिथे त्यांनी सांगितले की 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चाच्या दिवशी 4 शेतकरी नेत्यांना गोळ्या झाडण्याची सूचना देण्यात आली होती.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने म्हटले की, त्याला हे निर्देश हरियाणा पोलिसांचा एक अधिकारी प्रदीपने दिले होते. मात्र या दाव्यावर अद्याप सरकार किंवा हरयाणा पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षाने म्हटले की, आमची सर्वात वाईट भिती खरी ठरली आहे. यावरुन समजते की, ते (केंद्र सरकार) कशाप्रकारे शेतकरी आंदोलन संपवू इच्छित आहेत. पकडलेल्या व्यक्तीने सांगितले की, 'आमची योजना होती की 26 जानेवारीला आम्ही पहिल्या लाइनवर गोळ्या झाडू. यानंतर दिल्ली पोलिस शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतील. जर ते थांबले नाहीत तर त्यांना गोळी घालण्याचा आदेश आहे. मागून आमची टीम, ज्यात हरियाणाचे 8-10 मुले असतील, ते गोळ्या झाडतील करतील. पोलिसांना वाटेल की, शेतकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.

तसेच तो पुढे म्हणाला, 'ट्रॅक्टर रॅलीमध्ये गँगचे अर्धे लोक पोलिसांच्या वेशात असतील, जे शेतकऱ्यांना पांगवतील. यानंतर मंचावर जे चार लोक (शेतकरी नेता) असतील त्यांना शूट करण्याचा प्लान आहे. 4 लोकांचा फोटो आम्हाला देण्यात आला आहे. आम्हाला हे काम प्रदीप सिंह (SHO)यांनी सोपवले आहे. आम्ही त्याला पोलिस स्टेशन समोर कधीच पाहिले नाही. जेव्हाही आम्हाला भेटायला येत होता, तेव्हा चेहरा कव्हर करुन येत होता. ज्या लोकांना मारायचे होते, त्यांची नावे आम्हाला माहिती नाही, त्यांचा फोटो आमच्याकडे होता. '

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, जर या आंदोलनावर तोडगा लवकर निघाला नाही तर आंदोलनात चुकीचे आणि धोकादायक लोक घुसखोरी करु शकतात. अमरिंदर म्हणाले होते की, केंद्र सरकारला या प्रकरणाची गंभीरता कळायला हवी. पंजाब बॉर्डरजवळील प्रदेश आणि येथील 80 हजार शेतकरी दिल्ली बॉर्डवर 57 दिवसांपासून संघर्ष करत आहे. असेच सुरू राहिले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com