नवी मुंबई महानगरपालिकेत अग्निशमन सरळ सेवा भरती प्रक्रियेत भ्रष्ट्रावार

 

नवी मुंबई महानगरपालिकेत अग्निशमन सरळ सेवा भरती प्रक्रियेत उमेदवारांची शैक्षणिक अर्हता होती म्हणून प्रशासन विभागाने या उमेदवारांची निवड केली, त्यांची कागदपत्र पडताळणी झाली, मैदानी चाचणी, वैद्यकीय तपासणी व लेखी परीक्षा या सर्व प्रक्रिया पर्ण केल्यानंतर उप स्थानक व आग प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पुर्ण केला असल्याने निवड यादीमधून त्यांना अपात्र ठरवण्यात आले. सदरपाठयक्रम पदाच्या नियुक्तीकरिता पात्र आहे. असे असतानाही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निवड यादीमधून नाव वगळणे म्हणजे या भरती प्रक्रीयेमध्ये सरळसरळ भ्रष्ट्रावार झाला आहे, या भ्रष्ट्रावाराची चौकशी करून पात्र सर्व उमेदवारांना सरळसेवेत भरती करून घ्यावे, असे पत्र  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेला दिले आहे. याबाबत तात्काळ विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंतीही काळे यांनी केली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेमधील अग्निशमन विभागाच्या अंतर्गत गट - क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 3//२०१८ रोजी जाहिरात (क्रमांक २/२०१८) काढण्यात आली. सरळ सेवा भरतीसाठी विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने महापरीक्षा पोर्टल या संकेत स्थळा द्वारे भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. ४१६ उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवेते सामाऊन घेतले. परंतु १८ उमेदवारांना अग्निशामक पदाकरिता आवश्यक असणारी अर्हता धारण केलेली नसल्याचे कारण देत अपात्र करण्यात आले. सर्व १८ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. असे असताना संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी महानगरपालिका प्रशासन विभागाला विचारणा केली असता प्रशासन विभागाने त्यांना तमची शैक्षणिक अर्हता नसल्याने तुम्हाला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येत आहे. असे उत्तर दिले.  या सर्व उमेदवारांनी उप स्थानक व आग प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम १ वर्ष कालावधी असलेला प्रगत पाठ्यक्रम पुणे केलेला आहे आणि हा पाठ्यक्रम या पदाच्या नियुक्तीकरिता पात्र आहे, असे लेखी उत्तर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांनी दिलेले आहे. २००७ साली हाच पाठ्यक्रम पुर्ण केलेला उमेदवार ओमप्रकाश वाघमारे यांची अग्निशामक या पदावर नियुक्ती केली होती त्याचा पुरावासोबत जोडत आहोत. वरील 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA