Trending

6/recent/ticker-posts

धार्मिक उत्सव किंया कार्यक्रमाकरिता पोलीस ठाणेकडून विशेष परवानगी आवश्यक


 ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात  संचारबंदी

ठाणे 
जागतीक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोगा विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात व ठाणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे तसेच ब्रिटनची राजधानी लंडनसह पुर्ण इंग्लडमध्ये कोरोगाच्या नव्या प्रकारचा विषाणू संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोना ब्रिटनमध्ये आढलेला कोरोना  विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक घातक व वेगाने फैलावतो आहे.

  या अनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (१)(३) खालील तरतुदीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस हद्दीत दिनांक 22 डिसेंबर 2020 पासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात येत आहे. या कालावधीत धार्मिक उत्सव किंया कार्यक्रम साजरा करावयाचा असल्यास कार्यक्रम आयोजकांनी संबंधित पोलीस ठाणेकडून त्याबाबत विशेष परवानगी आवश्यक राहील. 

*संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू रहणार नाहीत*
  सर्व प्रकारच्या आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, विरंगुळ्यासाठी फिरणे, सायकल, मोटासायकल, मोटार वाहनांतून विनाकारण फेरफटका मारणे, अनावश्यक व विनाकारण होणारी वाहतूक, मोटार इमारतीच्या, सोसायटीच्या आवारात किंवा येथे साजरे होणारे खाजगी समारंभ, सांस्कृतीक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, हॉटेल आस्थापणा, पब्ज, बलय, रिसॉर्ट इत्यादी.

 *संचारबंदी कालावधीत खालील बाबी चालू राहतील*
सदर आदेशामुळे यापूर्वी शासनाने ज्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिलेली आहे त्या वैद्यकिय सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, अत्यावश्यक सेवा बजावणारे, अत्यावश्यक किंवा तातडीची वैद्यकिय गरज तसेच अत्यावश्यक सेवा उदा. दुध, भाजीपाला यांची वाहतूक व पुरवठा इत्यादी चालू राहतील. 
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल. असे  ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments