उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुंबई
वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन  दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२०पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला  उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री  उदय सामंत, आणि माजी राज्यपाल  डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत. तर दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष  नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते   प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील.  

२१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते  संमेलनाध्यक्ष ह.भ.प. अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधी दरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील. तरी सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA