आपण आपल्या बापाला ओळखूच शकलो नाही


 ओबीसी समाजाचा खरा बापू.बाबासाहेब आंबेडकर
ओबीसी समाज आजपर्यंत आपला असली बाप कोण आहे हे समजला नाही.आज सुद्धा आपण आपल्या दुश्मनाला बापू समतोय,आपला असली बापू तर.भिमराव आंबेडकर आहेत हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. या देशामध्ये चार वर्ण आहेत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र मग आपण ओबीसी समाज कोणत्या वर्णामध्ये येतो, ब्राम्हण, क्षत्रिय ,वैश्य यामध्ये आपला सामावेश आहे का नाही मग आपली गणती या मनुवाद्यांनी शुद्र वर्णामध्ये केली आहे.तर मग बाकी उरलेला ८५%समाज कोणत्या वर्णामध्ये येतो तर शुद्र वर्णामध्ये परंतु आपण हे मानायला तयार नाहीत प्रत्येक जात समजते आमची जात या जातीपेक्षा श्रेष्ठ त्या जातीपेक्षा श्रेष्ठ पहायला गेलो किंवा निरीक्षण करुन पहायल तर आपण सगळे एकच आहोत,

या मनुवाद्यांनी आम्हाला ६७४५ जातीमध्ये विभागणी करुन ठेवले आहे. ब्राम्हण, क्षत्रियाच्या, वैशाच्या जातीमध्ये रोटी बेटी व्यव्हार करतात. परंतु आपल्या  ओबीसी समाजा मध्ये रोटी बेटी होऊ नये म्हणून ओबीसी समाजाला षडयंत्र रचून रुढी परंपरा मध्ये जखडून ठेवले आहे, ओबीसी समाजाने आपल्या व्यक्तिगत जाती मध्येच रोटी बेटी व्याव्हार करावेत अशी जाणीवपूर्वक व्यवस्था या उच्च वर्णीयांनी केली आहे हे आपण जाणल पाहिजे. आशावेळी .बाबासाहेब १९३१ला इंगलंडचे पंतप्रधान रेंम्जे कनल यांच्या समोर प्रस्ताव मांडला आमच्या समाजाला तर काहीच अधिकार नाहीत आमच्या  ८५% समाजाला सुद्धा ८५% अधिकार पाहिजे, त्यावेळी रेंम्जे कनल म्हणाले मी तर तुमच्या समाजाला अधिकार द्यायला तयार आहे परंतु ज्यावेळी तुमच्या समाजाला अधिकार देण्यचा विषय येतो, त्यावेळी गांधी याला विरोध करता.म्हणजे असे म्हणता येईल कि मोहनदास गांधी यांनी बहुजन समाजाला रोटी,कपडा,मकान हा मुद्दा घेऊन त्यांच्या हक्क अधिकारा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हे लक्षात घ्यायला हवे,परंतु  आंबेडकर तुम्ही आपल्या भारत देशात जाऊन त्या जातींची सुची बनवा ज्या जाती आज सुध्दा गरीब आहेत मागासलेल्या आहेत.आशावेळी.बाबासाहेब यांनी एस सी,एस टी यांची यादी बनवायची सुरवात केली आणि म्हणाले ज्या ज्या जाती या लिस्टमध्ये आपली नावे नोंद करतील त्या जातींना अधिकार मिळतील.ही गोष्ट मोहनदास गांधी यांना कळताच ओबीसी समाजात सभ्रम निर्माण करुन त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न केला म्हणजे नेमक काय केल तर  .बाबासाहेब ओबीसी समाजाला म्हार,चांभार बनवत आहेत अशी सडकी बुद्धी वापरली मात्र ओबीसी समाज समजला नाही आणि म्हणू लागले आम्ही  म्हार, चांभार बननार नाही आणि ओबीसी समाजाने बाबासाहेब यांचे येकले नाही. 

ज्या जातींने येकले त्या जाती आय एस ,आय पी एस, डॉक्टर, इंजिनियर, वकिल झाले ज्यांनी नाही मानले ते ओबीसी एस सी,एस टी च्या मागे आहेत मागे आहेत याचा अर्थ ओबीसी शिकले नाही अस नाही परंतु त्यांच्या शिक्षणाची गती खुंटली म्हणजे जसी पाहिजे तसी प्रगती झाली नाही..बाबासाहेब यांच्या मिशनला चालवनारे मांन्यवर कांशिराम साहाब यांनी सांगितले होते, तुम्ही तुमच्या जाती मध्ये जाऊन गस्टीज फ संच अटेज करुन आणा,त्यावेळी सुद्धा ओबीसी समाजाने नकार दिला.त्यावेळी .बाबासाहेब खुप दुःखी  झाले,हे तर माझेच लोक आहेत. आज हे धोक्याचे बळी झाले आहेत, मनुवाद्यांचे शिकार झाले आहेत.त्यानंतर.बाबासाहेब यांना भारताचा संविधान बनवण्याची संधी मिळाली आणि बाबासाहेब यांनी ओबीसी समाजासाठी २७% अरक्षणची व्यवस्था व्यवस्था केली.व्यवस्था तर केलीच परंतु त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या तसेच राष्ट्रपती .राजेंद्र प्रसाद यांच्या हातात एक भक्कम असा संविधान सुपूर्त केला.आणि ओबीसी साठी २७% अरक्षण लागू करायचे होते. 

त्यावेळीचे पंतप्रधान झालेले नेहरू राजनिती ओळखत होते. अशावेळी ओबीसी समाजाला भ्रमित करुन सांगितले कि आम्ही विज्ञान भवन मध्ये काका कालेलकर आयोगाची नियुक्ती केली आहे.१७ वर्षामध्ये काका कालेलकर आयोगाने आपल्या आयोगात २०००पेक्षा अधिक जातींची नोंद केली आणि ८०० हून अधिक जाती अती मागास ठरविल्या.मागासपणा निश्चित करण्याचे काही निकषही ठरविले होते;पण १९५३ मध्ये नेमलेल्या आयोगाचा अहवालाच सरकारने फेटाळला.त्यानंतर नेहरु मरण पावले,त्यानंतर त्यांची मुलगी इंधीरा गांधी पंतप्रधान झाल्या मी वेळेवेळी पंतप्रधान म्हटल आहे यांचा सुद्धा खुप महत्त्व समजून घेतलं पाहिजे, तिने सुद्धा असेच फसवणूक करुन मंडळ आयोगाची नियुक्ती केली.१९८० मध्ये नियुक्त केलेल्या मंडळ आयोगाने ३७४३ जाती शोधून काढल्या.त्यांच्यासाठी २७%जागा राखीव ठेवण्याची शिफारस केली.असे बरेच अधिकार मंडळ आयोगात नमुद केले.हा अहवाल सुद्धा इंधिरा गांधी सरकारने १० वर्षे बासनात ठेवला.त्यानंतर राजीव गांधीने सुद्धा २७% ओबीसींना अरक्षण देणे योग्य समजले नाही.त्यानंतर व्ही.पी.सिंग यांनी जनतेमध्ये जाऊन सांगितले मी या निवडणूकीमध्ये निवडून आलो तर मंडळ आयोग लागू करेन,आणि ते निवडून आले.निवडून आल्यावर आपली सरकार पडेल या भितीने त्यांनी सुद्धा २७% ओबीसींचे अरक्षण लागू करणे योग्य नाही समले परंतु त्यावेळी मान्यवर कांशिराम साहब यांनी जनअंदोलन छेडले आणि प्रधानमंत्री व्ही.पी.सिंग यांना म्हणाले मंडळ कमिशन लागू करो वर्णा खुर्शी खाली करो त्यावेळी मांन्यवर कांशिराम यांच्या बरोबर जनअंदोलनात ३०लाख लोक जोडली गेली होती हे पाहून व्ही.पी.सिंग सरकार हादरले,आणि २७% मंडळ कमिशन लागू केले.आणि मनुवाद्यांच्या पोटात दुखायला लागले, रोडावर आले भारत देशाचे भरपूर नुकसान केले.मग व्ही.पी.सिंग यांची सरकारची खुर्ची गेली. हि मानसिकता आहे;

मनुवाद्यांची ज्यावेळी दलीत आणि ओबीसींचे हक्कअधिकार देण्याची वेळ येते तेंव्हा हे उच्च  वर्णीय काहीच देऊ इच्छित नाही.आपल्या समाजाला जाती जाती मध्ये वाटण्यामध्ये आपले भले समजतात .बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९४८ला लखनऊ मध्ये एका सभेमध्ये सांगितले होते;माझ्या ओबीसी च्या लोकांनो तुमच हित आहे ते फक्त बहुजन समाजाबरोबर आहे,ज्या दिवशी एस सी,एस टी,ओबीसी समाज एक होतील,तेंव्हा ओबीसींची सत्ता आल्याशिवाय रहानार नाही,आणि त्यावेळी मनुवादी उच्चवर्णीय ओबीसींचे चप्पल साफ करतील एवढे विचार आणि आपूलकी .बाबासाहेब यांनी आपला बाप या नात्यानं आपल्या भल्याचाच विचार केला परंतु आपण आपल्या बापाला ओळखूच शकलो नाही,याचीच खंत वाटते.

जय भारत, जय संविधान,जय ओबीसी

- भास्कर तुकाराम पवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1