Top Post Ad

शिवसैनिकांनी केला निषेध, इडीच्या कार्यालयाला केले भाजपचे प्रदेश कार्यालय

 भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये  किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे,  
१० वर्षांपूर्वीच्या व्यवहाराची आताच चौकशी का? - खा.संजय राऊत


मुंबई
शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पुत्रांवर इडीने काही दिवसापूर्वीच नोटीस बजावली त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसें यांना ईडीने नोटीस पाठवली. आता, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.  त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.  ईडीच्या संदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.  इडीचे वारे दिवसेदिवस महाराष्ट्रातच जोरात वाहू लागले आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावला आहे.  मुंबै बँकेचा प्रचंड घोटाळा इडीला दिसत नाही का असा सूरही काही शिवसैनिकांनी यावेळी लावला होता.  शिवसेना कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर बॅनर लावल्यानंतर पोलिस अधिकारी या ठिकाणी पोहचले. पण, शिवसैनिकांनी त्यांना बॅनर काढू दिले नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा, असे शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितले. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. 

दरम्यान  ईडीच्या नोटीसबाबत राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 50 लाखांच्या व्यवहाराबद्दल खुलासा केला आहे. 'हा व्यवहार 10 वर्षांपूर्वीचा आहे, मग आताच नोटीस का? असा सवालही राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी ईडीच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. ईडीची नोटीस ही दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही राऊत यांनी दिली. 'माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घराती मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे.  भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे' असा खुलासाही राऊत यांनी केला.

'जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये  किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे, त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा, माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आता माझ्याकडे आहे.  त्यासंदर्भातील माहिती सचिन सावंत यांनी ट्वीट सुद्धा केली आहे, भाजपच्या एका खासदाराचा एका बांधकामात सहभाग आहे, मग त्यांना नोटीस का नाही पाठवली?' असा सवालही राऊत यांनी विचारला. 'भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ही नेते बोलत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे' असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला.

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते.  प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.  प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच  हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com