Top Post Ad

सोमनाथ मंदिरापासून काही अंतरावर बौद्ध गुफा

 गुजरातमधील सोमनाथ मंदिराखाली 3 मजली इमारत आढळली आहे. IIT गांधीनगर आणि 4 संस्थांच्या पुरातत्व तज्ञांनी या इमारतीचा शोध लावला आहे. पुरातत्व विभागाने एक वर्ष केलेल्या तपासानंतर 32 पानांची रिपोर्ट सोमनाथ ट्रस्टला सुपूर्द केली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, मंदिराखाली L आकाराची एक इमारत आहे. तसेच, सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय द्वारापासून काही अंतरावर असलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ बौद्ध गुफा आहेत. तज्ञांनी 5 कोटी रुपयांच्या आधुनिक मशीनद्वारे तपासणी केली. जमिनीपासून 12 मीटर खोल GPR इन्वेस्टिगेशन केल्यानंतर समजले की, मंदिराच्या खालीदेखील एक इमारत आणि प्रवेशद्वार आहे.

असे म्हटले जाते की, सर्वात आधी एक मंदिर अस्तित्वात होते. दुसऱ्यांना सातव्या शतकात वल्लभीच्या मैत्रक राजाने याठिकाणी मंदिर बांधले. आठव्या शतकात सिंधच्या अरबी गव्हर्नर जुनायदने या मंदिराला तोडण्यासाठी आपले सैन्य पाठवले. यानंतर प्रतिहार राजा नागभट्टने 815इसवीमध्ये या मंदिराला तिसऱ्यांना बनवले. याच्या अवशेषांवर मालवाचे राजा भोज आणि गुजरातचे राजा भीमदेवने चौथ्यांदा निर्माण केले. पाचव्यांदा 1169 मध्ये गुजरातचे राजा कुमार पाल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुघल राजा औरंगजेबाने 1706 मध्ये मंदिराला पाडले होते. जूनागडला भारताचा भाग बनवल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी जुलै 1947 मध्ये सोमनाथ मंदिराला परत बांधण्याचे आदेश दिले. आता असलेले हे नवीन मंदिर 1951 मध्ये बनवण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com