कृषि विधेयकाचा बळी : शेतकऱ्यांची तब्बल २ कोटींची फसवणूक करून ट्रेडर्स फरार

 भोपाळ,
 केंद्रातील मोदी सरकारकडून संसदेत विरोधकांचा विरोध डावलत योग्य चर्चेशिवाय लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एका प्रकार मध्य प्रदेशात समोर आलाय. कारण शेतकऱ्यांची तब्बल २ कोटींची फसवणूक करून ट्रेडर्स फरार झाल्यानं खळबळ माजली आहे. त्यामुळे मोदी सरकारने लागू केलेल्या नव्या शेती कायद्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे  भाजपाची सत्ता असलेल्या असलेल्या मध्य प्रदेशातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं तब्बल २ डझन शेतकऱ्यांसोबत पिकांसाठी करार केला होता. मात्र, वेळ आली तेव्हा संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता ही कंपनीने गाशा गुंडाळून पळ काढला आहे. दोन डझन स्थानिक शेतकऱ्यांनी मसूर-चनाच्या पिकांसाठी जवळपास २ कोटी रुपयांचा करार केला होता. 'खोजा ट्रेडर्स'चे मालक असलेल्या दोन भावांनी शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतलं मात्र कंपनीकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स झाले. हरदाच्या देवास गावातील २२ शेतकऱ्यांना ‘खोजा ट्रेडर्स'सोबत करार केला होता. मात्र, ट्रेडर्स अचानक गायब झाला. 

शेतकऱ्यांनी माहिती काढली तेव्हा समोर आलं की, केवळ ३ महिन्यांतच कंपनीनं रजिस्ट्रेश संपुष्टात आणल होतं. संबंधित प्रकरणाची खातेगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलीय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना लिखित स्वरुपात तक्रार देण्यात आली आहे. ट्रेडर्सकडून देण्यात आलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूच्या गावांतील जवळपास १००-१५० शेतकऱ्यांसोबत ही फसवणूक झाली आहे. खोजा ट्रेडर्सकडून बाजार समितीपेक्षा ७०० रुपये अधिक दर देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. चेक बाऊन्स झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क केला. तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशनचं नसल्याचं समोर आलं.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे. विरोधकांनी देखील सरकारवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दात निशाणा साधला होता. अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत अशा शब्दांत वकील प्रशांत भूषण यांनी टीकास्त्र सोडलं होतं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA