आंदोलनातील आठ शेतकऱ्यांचा मृत्यू... मात्र कृषि विधेयक रद्द करण्यास सरकारचा नकार

 नवी दिल्ली
  केंद्र सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाविरोधात सुरु असलेल्या 
आंदोलनाच्या या १२ दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.  मात्र सरकार विधेयकावर ठाम असून याबाबत चर्चेच्या फेऱ्या निष्फळ होत आहेत.  केंद्र सरकारसोबत होणारी सहाव्या फेरीतील बैठक 9 डिसेंबर ऐवजी एक दिवस अगोदर म्हणजेच, काल (8 डिसेंबर) घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील ही बैठक देखील निष्फळ ठरली आहे. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी आपल्या मागणीवर ठाम असून सरकारने कृषि विधेयके रद्द करण्यास नकार दिला आहे. 

शेतकरी नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर तब्बल अडीच तास बैठक झाली. पण शेतकऱ्यांच्या हाती या बैठकीत देखील काही आले नाही. कृषि विधेयक मागे घेतला जाणार नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. तसेच विधेयकात कोणते बदल करता येतील या संदर्भात केंद्र सरकार शेतकरी संघटनांना माहिती पत्राद्वारे देण्यास तयार आहे. पण या विधेयकात बदल नको तर विधेयकच रद्द करा, यावर शेतकरी संघटना ठाम असून केंद्राचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. दुपारी बारा वाजता सिंघु बॉर्डरवर आज शेतकरी संघटनाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढची भूमिका ठरणार असल्याचे शेतकरी नेते हसन मोल्लाह यांनी काल बोलताना सांगितले होते.

दरम्यान  आंदोलनातील आणखीन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून सोमवारी अचानक टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती खालावल्यानंतर बहादूरगढमधील एका रुग्णालयात या शेतकऱ्याला दाखल करण्यात आले. पण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका या शेतकऱ्याला आला होता. या शेतकऱ्याने सुरुवातीला काही काळ उपचारांना प्रतिसाद दिला, पण आज ( ८ डिसेंबर ) सकाळी या व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हा शेतकरी टिकरी सीमेजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनात सहभागी होता.

शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या गज्जर सिंह नावाच्या शेतकऱ्याचाही यापूर्वी मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने गज्जर सिंह यांचा मृत्युही झाला होता. त्यांचा मृत्यू बहादुरपगड बायपासजवळ न्यू बस स्टॅण्डजवळच झाला होता. लुधियानामधील समराला येथील खटरा भगवानपूर गावचा गज्जर सिंह रहिवाशी होता. तो ५० वर्षांचा होता. तो शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होता. 

दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी आलेल्या मेकॅनिकच्या गाडीला आग लागल्याने या मेकॅनिकचाही मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. मेकॅनिकचा चारचाकी गाडीला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. जनकराज धनवाला मंडी येथील राहणारा असणारा हा तरुण आपले शेतकरी मित्र हरप्रीत, गुरप्रीत आणि गुरजंट सिंह यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बहादुरगड येथे आला होता. आंदोलनातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता. रात्री सर्वजण आपआपल्या जागी झोपण्यासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक गाडीने पेट घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA