Trending

6/recent/ticker-posts

जेएनयू आंदोलन प्रकरणी कॉ. प्रकाश रेड्डी, संभाजी भगत विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे

मुंबई
 गतवर्षी जेएनयूच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीविरोधात मुंबईतील विद्यार्थ्यांनी 2020 या नववर्षाच्या सुरवातीलाच मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर कब्जा केला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर तर केस घेतलीच पण तिथे उपस्थित असलेल्या अनेक पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते अशा 36 जणांविरुद्ध केस घेतली होती. आज 28 डिसेंबर रोजी केसमधील सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.  या सर्वांविरोधात 143, 149 भा दं वी सह 37 (3), 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केस केली आहे. यातील बहुतांश जण फक्त उत्सुकतेपोटी काय चालले आहे. हे पहात होते. त्यांनाही पोलिसांनी या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला जात आहे. 

जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. विद्यापीठातील विद्यार्थी - शिक्षकांवर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केला . संकुलातील मालमत्तेचंही नुकसान केलं . यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले . मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला होता . जेएनयूमध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर वांद्रे इथेही शांततेत हे आंदोलन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर आणि तोंड रूमालानं बांधून या आंदोलनात हल्ल्याचा निषेध नोंदवला . विद्यार्थ्यांसोबतच आंदोलनात लहान मुलांचाही सहभाग होता . फैज अहमद फैज यांच्या हम देखेंगे , लाजिम है की हम देखेंगे या कवितेतील ओळीचे पोस्टर , आझादी , हम एक है असे पोस्टर देखील झळकलेले दिसले . मोबाईलचे टॉर्च लावून आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवला होता. यावेळी या आंदोलनात सहभाग न घेतलेल्या मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांवर केस लावण्यात आल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.  आंदोलन स्थळी सरकार मधील आमदार, मंत्र्यांनी भेट देऊन भाषण केली होती. मात्र, त्यांच्यावर केस नाही. हा दुजाभाव पोलीस का करत आहेत असा सवाल विचारला जात आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, जेष्ठ पत्रकार जतीन देसाई, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सुबोध मोरे, लोकांचे दोस्त संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवि भिलाणे, जनता दलाच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर, भारत बचाव आंदोलनचे फिरोज मीठीबोरवाला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे आदी नेते कार्यकर्त्यांवर केस लावण्यात आल्या आहेत.कार्यकर्त्यांना आज वैयक्तिक जामिन देण्यात आला.२३ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.


Post a Comment

0 Comments