याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील

मुंबई
 आमच्या नेत्यांकडे दाखविले जाणारे बोट हे खाली करण्याची हिम्मत आमच्या कार्यकर्त्यांत आहे. सरकार टिकविण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही जबाबदारी आहे. त्यांनी याची दखल घ्यावी.किमान समान कार्यक्रमांवर सरकार चालले नाही तर ते पडेल, आमच्या पक्षातला कोणता नेता घ्यायचा असेल तर आमच्या पक्षाच्या नेत्यांना आधी विचारायला जायला हवे. असे जर होणार नसेल तर हे सरकार पडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, असा इशारा माजी मंत्री नसीमखान यांनी दिला.  मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी नसीम खान म्हणाले की, युपीए'चा नेता कोण असावा, हे शिवसेनेने ठरवू नये. सोनिया गांधी या 'युपीए'च्या अध्यक्ष होत्या, आहेत आणि राहतील. गेल्या आठ दिवसांपासून शिवसेनेच्या मुखपत्रातून सोनिया गांधी यांना बदलण्याची सूचना केली जात आहे. शिवसेना युपीए'मध्ये देखील नाही. त्यामुळे त्यांनी यावर सल्ले द्यायचे कारण नाही. किमान समान कार्यक्रमांतर्गत तीनही पक्ष एकत्र आले आहे. पण आमच्या पक्षातले लोक हे शिवसेना आणि राष्ट्रवादीत जाणार असतील तर ते चालणार नाही. आमचे नेते घ्यायलाच नाही पाहिजेत. आमच्या आमदारांकडे दुर्लक्ष केले जाते आम्हाला फंड नाही मिळत नसल्याचा आरोपही केला. मुंबईचा महापौर हा काँग्रेसचा करायचा आहे. आमच्याशिवाय महापौर होणार नाही. त्यासाठी आमच्याकडे लोकांनी यायला हवे, अशी परिस्थिती निर्माण करू. आमचे सगळे मंत्री नेते आणि कार्यकर्ते हे मंबई पालिका निवडणकीत उतरणार आणि आमची सत्ता आणणार. पक्षाची ताकद वाढली नाही, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. 

कोरोना काळात आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि राज्यात निर्वासितांना मदत केली, गल्लोगल्ली कार्यकर्ते मदत करायला फिरत होते. सरकारमध्ये आमच्या नेत्यांबद्दल बोलणार कोणी असेल, तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा असा इशारा मंत्री अस्लम शेख यांनी दिला. महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, अशी आशा आहे. महाविकास आघाडी असल्यामुळे काय फायदे-तोटे आहेत, ते बघायला हवे. आपली विचारधारा आपण सोडता कामा नये. आपण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकत्र लढवून विजय मिळवला पण आमच्या नेत्यांच्या विरोधात कोणी काही बोलायला नकोय. त्यासाठी आपण मजबूत व्हायला हवे, अशी अपेक्षा माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA