भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ अभिवादनास प्रतिबंध नको

मुंबई
भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यापासून अनुयायांना रोकू नये. ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंबेडकरी रोषाला सामोरे जाल असे मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकनच्या वतीने व्यक्त करण्यात आले आङे.  कोरोना सदृश्य स्तिथी पाहता देशासह सर्वत्र विविध उपाययोजना करण्यात आल्या व येत आहेत, सर्व प्रार्थना स्थळे सरकारने उघडी ठेविली असून सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचा सरकार विचार करत आहे, किंतु आंबेडकरी अनुयायांचे सर्व उत्सव व अभिवादन घरात बसून करा असे सांगत आहे या सरकारच्या  धोरणाचा जाहीर निषेधही करण्यात आला 

14 एप्रिल 20 रोजी महामानव विश्वरत्न डॉ. आंबेडकर म्हणजेच भीम जयंती उत्सव, बुद्ध पौर्णिमा,  अशोक विजयादशमी दसरा प्रामुख्याने बौद्धांचे प्रमुख उत्सव साजरे करण्यास सक्तीने बंदी आणली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनि अभिवादन करण्यास मज्जाव केला, अनुयायांनी शांत बसून घरातूनच उत्सव व अभिवादन केले, मात्र: आता सरकारने 1 जानेवारी 2021 ला भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यास रोखू नये. अभिवादन करण्यास एक नियमावली बनविण्यात येऊन जागोजागी सरकारने सॅनिटायजर चे फवारे उभारावेत, अभिवादन करण्यास रोखण्याऐवजी अनुयायांच्या अस्मितेचा प्रश्न जाणून भावणेचा सन्मान करावा व योग्य त्या उपाययोजना कराव्यात   आंबेडकरी जनता भोळी भाबडी असली तरी शिक्षित आहे, त्यांना प्रसंगावधान कळते, त्यामुळे सरकारने आंबेडकरी अनुयायांबाबत साशंकता बाळगू नये, त्यांना विनम्रपणे अभिवादन करू द्यावे पोलिस बळाचा व कायद्यांच्या कलमांचा वापर करून दबावतंत्राणे आंबेडकरी अनुयायांना वेठीस धरू नका असे आवाहन रिपब्लिकन डेमोक्रॅटीक पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA