" संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावं आणि शेतकरी विरोधी तीनही काळे कायदे त्वरित रद्द करण्यात यावे "
ठाणे
भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतातील शेतकरी देशाचा अन्नदाता आणि राजा गेल्या सहा वर्षात 2014 पासून भाजपाच्या आणि आर एस एस (RSS) च्या हुकूमशाही भांडवलशाही ,मनुवादी च्या राजवटीत शेतकरी राजालाच न्यायासाठी रस्त्यावर उतरून निवडून दिलेल्या वांझोट्या सरकार विरोधात लढा देण्याची वेळ आलेली आहे. दिल्लीत सुरुअसलेले शेतकरी एकजुटीच्या आंदोलनात एकजुट हेच मोठं यश आहे आंदोलनकारी शेतकरी बांधवांचे आता तरी ऐका ! इतकेच मागणे आहे !! आज पंजाब हरियाणा खवळलाय उद्या महाराष्ट्र खवळला आणि परवा संपूर्ण देश शेतकरी आंदोलनात सहभागी झाला तर काय होईल ? राज्यातील शेतकरी बांधव होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात केंद्रातील मनुवादी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रस्त्यावरची बुलंद लढाई लढण्यास सज्ज होईल ! असे स्पष्ट प्रतिपादन ओबीसी जन-आक्रोश मोर्चा संयोजक सुरेशभाऊ तुळशीराम पाटीलखेडे यांनी केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
.जगभरातील जनता शेतकऱ्याच्या आंदोलनावर आपलं मत प्रदर्शन करीत आहेत .परंतु मोदी- सरकार देशातील शेतकरी ,कामगारांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक देशोधडीला लावणारा काळा कायदा मंजुर करण्यात आला. मोदी सरकार अदानी , अंबानी व इतर काही पुंजी -पती व्यापाऱ्यां साठी लोकशाही आणि संविधानाचा गळा आवळू पाहत आहे .महाराष्ट्र राज्य सरकारने आणि शेतकरी बांधवांनी या कायद्याचा जाहीर निषेध करण काळाची गरज आहे .
आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडुन दिलेल्या भाजपच्या नेत्यांना भेट देऊन त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे . राज्यातील भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणून शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांची ( ओबीसी ) मागणी लक्षात आणून दिली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र राज्यातील ओबीसी जन -आक्रोश मोर्चा ( भाजप ) आमदार ,खासदार यांच्या बंगल्यावर शेतकरी -शेतमजूर मोर्चा वळविल्या शिवाय राहणार नाही !! गेल्या 2014 पासून सहा वर्षात स्वतःला हिरो समजणाऱ्या, पशु -पक्षाची , प्राण्यांची भाषा समजणाऱ्या परंतु शेतकरी बांधवाची भाषा न समजणाऱ्या मोदी सरकार ची अशी भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती .नपुसक पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा ही विकृत जोडी सिबीआय , इनकम tya क्स , ईडी , अमली पदार्थ विरोधी पथक आणि तरुणांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण करणारे हत्यारं म्हणजे आय टी सेल , म्याड मीडिया , सोशल मीडिया आणि हिंदू -मुसलमान , हिंदुस्थान -पाकिस्तान , जाती पातीच राजकारण करत ही मंडळी आता कुणालाही फसवू किंवा झुकवू शकतात हा गैर समज पंजाब हरियाणा व इतर राज्याच्या शेतकरी बांधवांनी खोटा ठरविला आहे .
छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज , राजे संभाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र व त्यांचे मावळे अनुयायी ओबीसी जन-आक्रोश मोर्चा संयोजक सुरेशभाऊ तुळशीराम पाटीलखेडे , डॉ अरुण सावंत अध्यक्ष संत तुकाराम सामाजिक विकास परिषद महाराष्ट्र राज्य , वसंत गणू पाटील उपाध्यक्ष संत तुकाराम सामाजिक विकास परिषद म.राज्य परिषदेचे मुख्य कार्यकारीनी व जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी कडुन आंदोलनकारी शेतकरी बांधवाना जाहीर पाठिंबा देणारे पत्र आज पाटीलखेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी राजाराम ढोलम कोकण प्रमुख , सुराशे ठाणे अध्यक्ष हे देखील उपस्थित होते.
0 टिप्पण्या