महाज्योती ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना देणार १२वी नंतरच्या इंजिनिअर मेडीकल प्रवेशाच्या जेईई /एमएच- सीईटी, /नीट स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण
, या वर्षी ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २५ डिसेंबर पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी! —प्रा. दिवाकर गमे,संचालक, महाज्योती.
महाराष्ट्र शासनाने ओबीसी साठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची ची निर्मिती केली आहे! या संस्थेचे मुख्य कार्यालय नागपुर येथे आँगस्ट २०२० मध्ये सुरू झाले असुन, सर्वप्रथम ओबीसी , एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी फार मोठा व महत्वाकांक्षी कार्यक्रम याच्या माध्यमातुन घेतलेला आहे. ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनी ह्या १२ वी नंतर इंजिनिअर मेडीकल आयआय टी अशा व ईतर महत्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा जेईई/ एमएच-सीईटी- नीट अशा देत असतात! पण त्यासाठी विशेष स्पर्धा परीक्षेचे महागडे कोचिंग क्लास लावण्याची आर्थिक कुवत ही ओबीसी ,भटके व विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नसते!त्यामुळे हे विद्यार्थी या महत्वाच्या स्पर्धा परीक्षेत टिकाव धरू शकत नाही!
ही बाब लक्षात घेवुन,महाज्योतीने, २०२२ मध्ये होणार्या या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, व त्यासाठी राज्यातील प्रमुख सर्व वर्तमानपत्रांमध्ये जाहीराती देवुन, वर्ग ११ वी विज्ञान शाखेत शिकणार्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे, असे या महाज्योतीवर शासनाने नियुक्त केलेले संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगीतले आहे!
यासाठी ओबीसी वीजेएन टी ,एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावुन यासाठी २५ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करावयाची आहे!यासाठी या वर्षी वर्ग ११ वी सायंस ला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत, ते शहरी भागातील शाळांमधुन १० वी ला ७०% गुण, व ग्रामीण,आदिवासी व नक्षलग्रस्त भागातुन १० वी पास करणारे ६०% व त्या वरील गुण प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच ज्यांचे उत्पन्न मर्यादा ही नाॅन क्रिमिलेयर प्रमाणे वार्षिक ८ लाख रूपये आहे असे विद्यार्थी महाज्योतीकडे मोफत प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे!
या महाज्योती प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी,५०%,नागरी विभाग १५% नगरपंचायती १५%व आदिवासी व नक्षलग्रस्थ विभागासाठी १५% जागा राहणार आहे! या प्रमाणे राज्यातील सर्व घटकांना त्यांच्या या प्रमाणात प्रतीनिधीत्व ,न्याय व संधी मिळावी हा प्रयत्न केलेला आहे! त्याच प्रमाणे,इतर मागास जाती, विमुक्त व भटक्या जाती आणि विशेष मागास जाती यांना सुध्दा आरक्षणाच्या प्रमाणात या विद्यार्थ्यांना समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे!त्या प्रमाणे ईतर मागास वर्ग चे ६८०० विद्यार्थी,विमुक्त व भटके जाती २७०० विद्यार्थी आणि विशेष मागास जाती ५०० विद्यार्थी अशा प्रकारे १० हजार विद्यार्थी या मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जातील! सध्याच्या कोविड चा काळ लक्षात घेवुन या विद्यार्थ्यांची २०२२ या वर्षीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी , महाज्योतीच्या नागपुर कार्यालयात आॅनलाईन व्हर्च्युअल माडर्न क्लास रूम तयार करण्यात येत आहे! त्या ठिकाणी राज्यातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे पॅनेल तयार करण्यात येवुन, निवडलेलया विद्यार्थ्यांना त्यांच्याकडुन आनलाईन व आॅफलाईन माध्यमातुन स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण नियमितपणे देण्यात येणार आहे!त्यासाठी निवडलेलया १० हजार विद्यार्थ्यांना, शासनाकडुन महाज्योतीला निधी प्राप्त झाल्यावर टॅब देण्याची,तसेच या बाबतची स्पर्धा परीक्षेची पुस्तके व शैक्षणिक साहित्य व ईतर सर्व मदत देण्याची योजना आहे!
तरी या ओबीसी,विमुक्त व भटक्या जाती, विशेष मागास जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थाळावर जावुन, आपली विनामुल्या नोंदणी करावी. तसेच राज्यातील व विशेषत: ग्रामीण,आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान प्राध्यापकांना सुध्दा विनंती करण्यात येत आहे की, त्या महाविद्यालयात या वर्षी ११ विज्ञान वर्गात प्रवेश घेतलेलया ओबीसी विमुक्त व भटक्या जाती आणि विशेष मागास जातीच्या पात्र विद्यार्थ्यांना, २०२२ मध्ये होणार्या इंजिनिअरींग मेडीकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी , महाज्योती कडे मोफत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी एका निवेदनाव्दारे केले आहे!
0 टिप्पण्या