मुंबई
मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. या कायद्यांवर जवळ-जवळ सर्वच शेतकरी संघटनांनी चर्चा केली आहे. एसएसपी बंद करण्याची चर्चा करणे हे सर्वात मोठे असत्य असून एमएसपी बंद होणार नसल्याचे मोदी म्हणाले. सतत कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना, कृषीतज्ज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, कृषी वैज्ञानिक, आमच्याकडील सुधारणावादी शेतकरी करत आहेत. आपल्या ज्या पक्षांनी जाहीरनाम्यांमध्ये कृषी कायद्यात दु्रुस्तीचे वचन दिले होते, शेतकऱ्यांची जे मते घेत आले आहेत आणि ज्यांनी काहीच केले नाही आणि या मागण्या टाळत आले, अशा लोकांकडे खरेतर शेतकऱ्यांनी उत्तर मागितले पाहिजे. फायलींच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलेला स्वामीनाथन समितीचा अहवाल आम्ही बाहेर काढला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या, शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट एमएसपी दिल्याचेही मोदी पुढे म्हणाले.
मात्र अडाणी यांनी शेतकरी बील येण्याआधीच प्रचंड जमिनीची खरेदी करून साठवण कोठारे निर्मिती करण्याचे काम कसे काय सुरु केले याबाबत मात्र प्रधानमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. तसेच शासनाच्या सर्व कृषि विषयक योजना अंबानी यांच्या कंपन्यांना कशी काय या प्रश्नाचे उत्तरही अद्याप न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. “आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसंच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून जवळपास तीस शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे”. “त्याच्याच पुढच्या टप्प्यात २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाणार आहे. ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्या दोघांमधील अंबानी हे जगात पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत येत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे. हे एकदाचे सांगून तरी टाक हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातुन विचारणार आहोत. जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. पण आपल्या शेतकर्यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत आहे”. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील शेतकर्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन देखील करणार आहेत. अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
0 टिप्पण्या