Top Post Ad

ठाण्यात विविध पक्ष संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन


ठाणे
 केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरातील शेतकर्‍यांनी भारत बंदची हाक दिली आहे. बंदअंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सर्व ठप्प होणार आहे. देशातील सर्व प्रमुख पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. याशिवाय सर्व शेतकरी संघटनाही बंदमध्ये उतरल्या आहेत. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत यासाठी ठाण्यातही आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेल, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, जयभीम आर्मी, शेतकरी संघटना आदी पक्ष संघटनांनी ठाणे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटीलखेडे,  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे प्रवक्ते चंद्रभान आझाद तसेच नवी मुंबई ऐरोली युवा अध्यक्ष सचिन मगर, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवि चांगो शिंदे, तसेच सरचिटणीस प्रमोद इंगळे,  जयभीम आर्मीचे संजय कांबळे यांच्यासह भुपेंद्र सिंह अग्रवाल ( पप्पुभाई ) अवतारसिंग-रावत, कुलदिपसिंह-मुंडे, गुरुमेल सिंह-मठरू, समिर मर्चंट, ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विजय बनसोडे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. 


किसान आंदोलन व भारत बंदच्या समर्थनार्थ ठाणे जिल्हा मुख्यालया जवळ निदर्शने 
जनआंदोलनाची संघर्ष समिती, जनआंदोलनांचे राष्ट्रीय समन्वय आणि श्रमिक जनता संघ इत्यादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारत बंदचे समर्थन व शेतकरी यांच्या मागण्यांसाठी ठाणे जिल्हा मुख्यालयात शांततेत निदर्शने केली.शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करा, तिन्ही कृषी कायदे रद्द करा, सर्व काळे कामगार कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा वगैरे घोषणा देत या वेळी केंद्र सरकारचा निषेध केला  गेला. 
आज देशभरातील लाखो शेतकरी, कामगार आणि बिगर भाजपा पक्षांनी भारत बंद जाहीर केला आहे.  याला पाठींबा देण्यासाठी  ठाणे येथे विश्वास उगी (निमंत्रण, जन आंदोलन संघर्ष समिती), डॉ. संजय मंगला गोपाळ (जनआंदोलनांचे राष्ट्रीय समन्वय), जगदीश खैरलिया- (श्रमिक जनता संघ), एमए पाटील - (अंगणवाडी कर्मचारी संघटना), संजय  वाधवकर, (हिंद मजदूर सभा), भास्कर गव्हाळे, (शासकीय कर्मचारी संघटना) आणि अजय भोसले, सुनील दिवेकर आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1