आर.टी.ई. 25% प्रवेशाची प्रतीक्षा यादी - ३ (waiting list -3) ची निवड प्रक्रीया पुर्ण;
197 अर्जांची निवड*
*१७ डिसेंबर २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा -
शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) ललिता दहितुले यांचे आवाहन*
विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया MAHADBT PORTAL वर दिनांक 15 डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत. सर्व अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया MAHADBT PORTAL मध्ये सुरु करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत.
शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-20 या वर्षाचे MAHADBT PORTAL वर परिपूर्ण अर्ज भरूनही व समाज कल्याण विभागातर्फे अर्ज मंजूर असताना विद्यार्थ्याला त्याच्या प्रोफाइल मध्ये गेल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम वितरित झालेली असल्याचे दिसून येते परंतु त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची यादी ते शिकत असलेल्या महाविद्यालयांना पाठविण्यात आलेली आहे तरी अशा विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन ठाणे सहायक आयुक्त,समाज कल्याण बलभीम शिंदे यांनी केले आहे.
-----------------
ठाणे जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती
--------------------
आर.टी.ई. 25% प्रवेशाची प्रतीक्षा यादी - ३ (waiting list -3) ची निवड प्रक्रीया पुर्ण;
197 अर्जांची निवड*
*१७ डिसेंबर २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा -
शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) ललिता दहितुले यांचे आवाहन*
ठाणे
निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. प्रवेश घेताना covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व पालकांनी Social Distancing च्या नियमांचे पालन करावे . शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
महत्वाचे :- प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील.
0 टिप्पण्या