लोकमान्यनगरातील रेप्टाकॉस कंपनीची जागाही क्लस्टरसाठी आरक्षित करावी

ठाणे: 
ठाण्यातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर) अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोची मदत घेण्यास ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. गृहनिर्माण सुनियोजित प्रकल्पांमध्ये सिडको आणि म्हाडाचा अनुभव दांडगा असल्याने शहराचा नियोजनबद्ध विकास होऊन क्लस्टरला टेकू मिळणार आहे. क्लस्टरच्या १२ आराखड्यांना यापूर्वीच अंतिम मान्यता दिली असतानाच त्यापाठोपाठ आता तिसऱ्या टप्प्यात आणखी नऊ नागरी पुनर्निर्माण आराखड्यांना मंजूरी दिली आहे. 

त्यामध्ये उपवन २, मानपाडा २, कोकणीपाडा १, भीमनगर आणि कोकणीपाडा २, तसेच सेक्टर-९मधील मुंब्रा १ व कौसा तसेच सेक्टर- ११ मधील शीळ या भागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर केला.  

आता तिसऱ्या टप्यातील लोकमान्यनगरातील रेप्टाकॉस कंपनीची जागाही यासाठी आरक्षित करावी, अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली. किंबहुना, क्लस्टरच्या ज्या काही जागा असतील त्या ठिकाणचीही आरक्षणे ताब्यात घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. आता तिस-या टप्प्यातील ज्या नऊ जागा आहेत, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA