Top Post Ad

शेतकरी विधेयक, मतपत्रिकेवर मतदान यासह विविध मागण्यांसाठी आरपीआयची आझाद मैदानावर निदर्शने

मुंबई-
केंद्र सरकारचे शेतकरी विधेयक रद्द करा . इंदू मिल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करा ,मतपत्रिकेवर मतदान, भारतीय संविधानच शालेय अभ्यासक्रमात समावेश यासह विविध मागण्यांसाठी आरपीआय डेमोक्रॅटीक या पक्षाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर पक्षनेते कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली . 

दादर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम जलद गतीने सुरु करण्यात यावे, आगामी निवडणूक एव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे केंद्राद्वारे संमत  करण्यात आलेले जाचक शेतकरी विधेयक त्वरित रद्द करावे , २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा संविधानाचा शालेय माध्यमिक अभयसक्रमात समावेश करण्यात यावा अंधेरी एमआयडीसी एसआरए प्रकल्पातील भ्रष्ट्राचारासाठी समिती नियुक्त करावी,आरे वसाहतीतील झोपडीवासीयांना वीज व पाणी व इतर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्या या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे    करण्यात आल्या . वसंत कांबळे राजन माकणीकर,श्रावण गायकवाड,इम्रान मन्सुरी , महाराष्र अध्यक्ष हरिभाऊ कांबळे,हीविजय चव्हाण,सचिन भुतकर,राजेश पिल्ले,रत्नाकर रणदिवे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व महिला यावेळी मोठ्या संख्येने हजार होते . मागण्या मेनी न झाल्यास आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा ईशारा कनिष्क कांबळे यांनी यावेळी बोलताना दिला . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com