Top Post Ad

सडलेला मनुवाद गाडलेला बरा

-प्रा. मा. म. देशमुख 

मनुवाद हा मानवतावादाचा शत्रू होय. भारतातील सर्व वाद मनुवादाने बाद केले आहेत. मनुवादाचा उगम मनुस्मृतीत शोधण्यात येतो. वास्तविक पृथ्वीवर मानवाच्या उदयाबरोबरच मानव समाजात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा जन्म झाला. ही दुष्ट प्रवृत्तीच म्हणजे मनुवाद होय. दुर्बलांना आपल्या गुलामीत ठेवण्याची दुर्बुद्धी म्हणजे मनुवाद. `वरच्यांना माथा आणि खालच्यांना लाथा' अशी विषमतावादी मनोवृत्ती म्हणजे मनुवाद. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मानवी मूल्ये पायदळी तुडविणारी प्रवृत्ती म्हणजे मनुवाद. सत्याचा तिरस्कार आणि असत्याचा स्वीकार म्हणजे मनुवाद. 

मनुवाद आणि बामण पंडित
बामणी वर्चस्व चिरकाल टिकविण्यासाठी ब्राह्मण पंडित प्राचीन काळापासून योजनाबद्ध कार्यक्रम राबवित आहेत. गुलामांना गुलामीची जाणीवच होणार नाही अशी त्यांची कुटिल कार्यशैली आहे. यासाठी ते सतत मनुवादाचे उदात्तीकरण करीत आहेत. मनुवादी मूल्ये प्रतिष्ठीत करण्यासाठी अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या योजित आहेत. यासाठी त्यांची प्रचार यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे. 

बामणीकरण 
मनुवाद पक्का करण्यासाठी बामण पंडितांनी अनेक ग्रंथांचे, व्यक्तींचे, विचारांचे आणि विषयांचे बामणीकरण केले आहे. यासाठी त्यांनी बुद्धाला दशावतारात समाविष्ट केले. तर शिवरायांना गो-ब्राह्मण प्रतिपालक बनवून टाकले.
वेद, रामायण, महाभारत, पुराणे, स्मृती वगैरे ग्रंथांचेही त्यांनी ब्राह्मणीकरण केलेले आहे. भारतातील अनेक राजांचे एवढे बामणीकरण झाले होते की, धर्मग्रंथातील कायद्यांना विरोध करण्याची हिंमत कोणताही राजा दाखवित नसे. बुद्धासारखे राजे याला अपवाद होते.
आज तर बहुतेक पक्षांतील पुढाऱयांचे, अधिकाऱयांचे आणि विद्वानांचे ब्राह्मणीकरण झालेले आढळते. (अपवाद असतील त्यांना वंदन) 

असत्य आणि काल्पनिक मनुवादी वाङ्मय
मनुवाद हा केवळ मनुस्मृतीतच नाही. संपूर्ण प्राचीन आणि अर्वाचीन बामणी वाङ्मय मनुवादाने सडवून टाकलेले आहे. ही संख्या एवढी प्रचंड आहे की, प्रस्तुत लेखात त्यांचा उल्लेख करणेही शक्य नाही.
वेदांपासून आजपर्यंतचे संपूर्ण बामणी वाङ्मय काल्पनिक, कपोलकल्पित, असत्य, असभ्य, अमानवी आणि अवास्तव अशा घटनांनी भरलेले आहे. अंधश्रद्धांनी सडलेले आहे. प्रत्येकाचा परामर्श घेणे शक्य नसले तरी काही नमुने बघू. 

वेद
वेद म्हणजे भेद. हे वेद पाठांतर पद्धतीने टिकविण्यात आल्यामुळे शेकडो वर्षे ते लिखित स्वरुपात नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्राचीन लिखित प्रती उपलब्ध नाहीत. पाठांतर पद्धतीमुळे पाहिजे तो मजकूर काढणे किंवा घालणे शक्य झाले.
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात पुरुषसुक्त घुसविण्यात आले. त्याद्वारे चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण करता आली. बामणेतर बहुजन समाजाला वेदांचे पठन आणि श्रवण करायची बंदी होती.
वेदांचे महात्म्य वाढविण्यासाठी ते ईश्वराने निर्माण केले आहेत (अपौरुषेय) अशी थाप मारण्यात आली. 

रामायण-महाभारत
ब्राह्मणी श्रेष्ठत्व आणि महात्म्य वाढविण्यासाठी रामायण आणि महाभारत या प्राचीन महाकाव्यांतसुद्धा बरेच फेरबदल करण्यात आले आहेत.
रामायण- हे महाकाव्य वाल्मिकीने रचले. त्यात प्रारंभी 12 हजार श्लोक होते. आज या श्लोकांची संख्या 24 हजार आहे.  

महाभारत-
हे महाकाव्य व्यासाने रचले. त्यात प्रारंभी 8800 श्लोक होते. पुढे त्यात अनेकांनी भर घातल्यामुळे महाभारतातील श्लोकांची संख्या एक लक्ष झालेली आहे.
रामायण आणि महाभारात ह्या प्राचीन महाकाव्यांच्या मूळ प्रती (हस्तलिखित) उपलब्ध नाहीत. ज्या प्रती उपलब्ध आहेत त्या अगदी अलीकडच्या काळातील आहेत. आश्चर्य असे की, भारतातील निरनिराळ्या प्रदेशांत मिळणाऱया रामायण आणि महाभारत या  ग्रंथांच्या प्रतींमध्ये एकवाक्यता नाही. त्या सारख्या नाहीत. त्यातील माहितीत फरक आढळतो.
या दोन्ही महाकाव्यांचे ब्राह्मणीकरण झालेले आहे. ही महाकाव्ये बहुजन समाजाने स्वीकारून बामणी श्रेष्ठत्व मान्य करावे असे योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यांचे कर्ते वाल्मिकी आणि व्यास हे बहुजनांतील होते असे दाखविले आहे. 

वाल्मिकी- हा रामायणाचा कर्ता असून तो कोळी होता, असे सांगितले जाते.
व्यास- हा महाभारताचा कर्ता होय. तो सत्यवती नावाच्या कोळी कुमारिकेचा पुत्र होय. `धीवरकन्या सत्यवती ही लग्नापूर्वी कुमारिका असूनदेखील माता झाली होती. ती नौका चालवित होती. पराशर मुनीची व तिची नौकेत गाठ पडली. दोघांचे प्रेम जमले. तिला पराशर मुनीपासून कृष्णद्वैपायन व्यास हा पुत्र यमुनेच्या एका बेटावर झाला. हाच महाभारतकार व्यास होय.' (संदर्भ- मराठी विश्वकोश, खंड 12, पृष्ठ. 1406) अशारितीने महाभारताचा कर्ता व्यास ह्याची माता कोळी समाजाची होती असे दाखविले आहे. 

मनुस्मृती-
मनुस्मृतीचा कर्ता मनू हाही बामणेतर आहे, असे सांगण्यात येते. प्राचीन वाङमयात मनुबद्दल बरेच मतभेद आढळतात. मनू नावाची एखादी व्यक्ती झाली किंवा नाही याबद्दलही शंका येते. मनू एक नसून अनेक होऊन गेलेत असेही सांगण्यात येते. मनुच्या माता-पित्यांबद्दल मतभेद आहेत.
``मनुने आपली कन्या इला हिच्या ठिकाणी 10 पुत्र निर्माण केले व मनुष्यवंश सुरू केला असे महाभारतात (अनुशासन -147-27) म्हटले आहे.'' (संदर्भ- मराठी विश्वकोश-खंड-12, पृष्ठ-1135)
(म्हणजे मनुसुध्दा ब्रह्मदेवाप्रमाणे आपल्या मुलीशीच व्यभिचार करणारा होता.)

निष्कर्ष-ही सगळी बामण पंडितांची कुटिल करामत आणि बनवाबनवी- ब्राह्मण पंडितांच्या मनुवादी कारस्थानांचे काही नमुने आतापर्यंत आपण पाहिले. 

1) वेद, रामायण, महाभारत, मनुस्मृती हे ग्रंथ काल्पनिक आहेत. त्यांचे कर्ते अनुक्रमे देव, वाल्मिकी, व्यास आणि मनू हे अस्तित्वातच नव्हते आणि नाहीत. ते झालेच नाहीत.
(कौटिल्या आणि त्याचे अर्थशास्त्र याबद्दलही असेच मतभेद आहेत) 

2) ह्या धर्मग्रंथांचे कर्ते बामण पंडितच होते. बहुजन समाजाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी देव, वाल्मिकी, व्यास आणि मनू ही नावे पुढे केली. ही सगळी मनुवादी भटांचीच करामत होय. लबाडी होय. 

3) बहुजन समाजावर आपले श्रेष्ठत्व लादून त्यांना गुलाम ठेवण्यासाठी ब्राह्मण पंडितांनी रामायण, महाभारत वगैरे धर्मग्रंथात बरीच घुसवाघुसव केलेली आहे.  

4) रामायण आणि महाभारत म्हणजे इतिहास नव्हे. हे सत्य जगातील सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. जे मान्य करीत नाहीत ते खरे इतिहासकार नव्हेत. तोतये इतिहास पंडित आहेत. 

मनुवादाची लागण
आज भारतातील बामणेतर बहुजन समाजाला मनुवादाने ग्रासलेले आहे. जातीभेद, अस्पृश्यता, उच्चनीचता, महिलांची दुर्दशा, अंधश्रद्धा, दंगली, भ्रष्टाचार, दारिद्र्य, बेकारी, शोषण, निरक्षरता, अन्याय, अत्याचार, आणि भटजी-शेटजी-लाटजींची सत्ता ही मनुवादाला आलेली भयंकर विषारी फळे आहेत.
सडलेली फळे ज्याप्रमाणे दुर्गंधी आणि साथीचे रोग पसरविण्यास कारणीभूत ठरतात, त्याचप्रमाणे सडलेला मनुवादही बहुजनघातक ठरत आहे.
ग्रंथ, प्रसारमाध्यमे, धार्मिक मेळावे, रुढी, परंपरा वगैरे साधनांद्वोरे बहुजन समाजात मनुवादाचा प्रसार झालेला आहे आणि आजही होत आहे.
कर्मकांडे, व्रतवैकल्ये, रुढी, परंपरा वगैरेंद्वारे मनुवाद बहुजन समाजात बराच खोलवर मुरविण्यात आलेला आहे. बहुजन हा भटांचा गुलाम बनला आहे. मनुवादी गुलामीच्या शृंखलांना तो आपली आभूषणे मानू लागला आहे. ह्या गुलामगिरीची जाणीव करून देणाऱयांवरच तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रोगी जसा पिसाळतो, तशी अवस्था मनुवादी जंतुंची लागण झालेल्या समाजाची झालेली आहे. 

मनुवादाची लागण झालेली क्षेत्रे
1) सामाजिक क्षेत्र आणि मनुवाद
चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, महिलांची दुर्दशा, उच्चनीचता, घातक रुढी-परंपरा अशा अनेक मनुरोगांनी सामाजिक क्षेत्र सडवून टाकलेले आहे. ब्राह्मणेतर बहुजन समाज मनुवाद्यांचा बळी ठरलेला आहे. बहुजनांतील सामाजिक दोष दूर करणे म्हणजे मनुवाद दूर करणे होय. 

2) धार्मिक क्षेत्र आणि मनुवाद
धार्मिक क्षेत्र तर मुनवाद्यांचे राखीव कुरण बनले आहे. बामण पंडित स्वतला हिंदुंचे धर्मगुरु मानतात. बामणेतर बहुजनांचे अनभिषिक्त धार्मिक प्रतिनिधी मानतात. स्वतला भूदेव मानतात. 

पुढील श्लोक बघा-
देवाधीनं जगत्सर्वं, मंत्राधीनंच दैवतम।
ते मंत्रा बामणाधीना, बामणो मम देवतम।।  (भागवत)
(भावार्थ- सर्व जग देवांच्या स्वाधीन, देव मंत्रांच्या स्वाधीन, मंत्र बामणाच्या स्वाधीन, म्हणून बामण आमचे देवच आहेत.) 
आणखी एक श्लोक बघा-
पृथिंव्यां यानि तीर्थानि ताणि सर्वाणि सागरे ।
सागरे सर्व तीर्थानि पदे विप्रस्य दक्षिणे ।।
(भावार्थ- पृथ्वीवरील सर्व तीर्थांचे श्रेय सागरात असते आणि बामणांच्या उजव्या पायात सर्व सागरांचे पुण्य साठविले आहे.)
असा बामणेतर बहुजन समाजाला हीन लेखणारा आपल्या घाणेरड्या पायांचे तीर्थ पाजणारा वैदिक धर्म (हिंदू धर्म) ह्या भटांनी खोट्या पोथ्या  रचून बनविला आहे.
नवनवीन देव आणि धर्मविधी यांची संख्या वाढवून बामण पंडितांनी आपल्या उदरनिर्वाहाची आणि `हौसमौजेची' उत्तम व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपले भ्रष्टाचार, भटाचार, दुराचार, व्यभिचार, बलात्कार, खून यासारखी कृत्ये लपविण्यासाठी हा पंडितवर्ग चमत्कार आणि अंधश्रद्धा वाढवित असतो.

वस्तुस्थिती अशी आहे- ब्राह्मण ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याचे खरे नाव वैदिक धर्म आहे. वेद हे वैदिक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. हिंदू हा शब्द सिंधू या शब्दावरून बनलेला आहे. तो लोकप्रिय असल्यामुळे बामण पंडितांनी आपल्या वैदिक धर्माला `हिंदू धर्म' असे नाव दिले. वास्तविक हिंदू हा शब्द धर्मवाचक नसून प्रदेशवाचक आहे. वैदिक हिंदू धर्म हा बामणांचा धर्म असून त्यांचा बामणेतर बहुजनांशी काहीही संबंध नाही. शंकराचार्य सुद्धा बामणांचे धर्मगुरु आहेत. आपले बहुजनांचे नाहीत. थोडक्यात, बामणांचा धर्म, देव आणि धर्मगुरु वेगळे आहेत.
शंकर, राम, कृष्ण हे बामणांचे देव नव्हेत. बहुजनांचे आहेत. आमच्या (प्रा. मा. म. देशमुख) `शिवराज्य' ह्या ग्रंथात पृष्ठ 49-50 वर यासंबंधीची सत्यस्थिती सांगितलेली आहे. 

हे प्रश्न विचारा- 

1) हिंदू धर्माचा संस्थापक कोण? 2) हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता? ह्या दोन प्रश्नांची लेखी उत्तरे शंकराचार्य आणि त्यांच्या अनुयायांना विचारा. 

`सारा हिंदू समाज', असे मोघम शब्द वापरून या देशातील 85 टक्के बहुजनांच्या वतीने बोलणारे जे बामण नेते आणि त्यांचे हस्तक असतील त्यांना हा अधिकार कसा मिळाला? कुणी दिला? हे प्रश्न हातात जोडा घेऊन जोपर्यंत बहुजनांकडून विचारण्यात येत नाहीत, तोपर्यंत ह्या सडलेल्या मनुवादातून बहुजन समाजाची मुक्तता होणे शक्य नाही. म्हणून `बहुजन जोडा आणि मनुवाद्यांना मारा जोडा.' 

3) आर्थिक क्षेत्र आणि मनुवाद 

चातुर्वर्ण्यव्यवस्थेनुसार झालेली व्यवसायनिश्चिती आजही अस्तित्वात आहे. आजही आपला व्यवसाय सोडण्याची मानसिकता अनेक जातींमध्ये दिसत नाही.  

शिवाय, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या भ्रष्ट व्यक्तींनाही मान देण्याची मनुवादी मनोवृत्ती बहुतेक जातींत आढळून येते. बहुतेक जातींत त्या त्या जातींतील श्रीमंतांचेच वर्चस्व आढळून येते. पैसा (संपत्ती)  असला की, `अक्कल' आपोआपच येत असते, अशी मनुवादी मानसिकता आर्थिक क्षेत्रातही दिसून येते. ही मानसिकता सोडा आणि मनुवाद गाडा. 

4) सांस्कृतिक क्षेत्र व मनुवाद 

शिक्षण, कला व क्रीडा क्षेत्रे, सिनेमा, दूरदर्शन, वर्तमानपत्रे वगैरे क्षेत्रांना मनुवादाची भयंकर लागण झालेली आहे. 

प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व विषयांत मनुवाद्यांचे जंतू शिरलेले आहेत. परिणामी देशापेक्षा देव मोठा मानणे, रंजल्या-गांजल्या ग्रामीण गरीबांचा तिरस्कार, शेतकरी, कष्टकरी, मजूर वगैरेंबद्दल तुच्छतेची भावना, भ्रष्ट, उच्चपदस्थ व श्रीमंतांबद्दल आदर, बामण्य आणि बामणांचा पुरस्कार अशी अमानवी विषमतावादी, देशद्रोही `मनुवृत्ती' असलेला शिक्षितवर्ग आजच्या शिक्षणातून तयार होत आहे. (अपवाद असतील त्यांना वंदन!) ही मनुवादी मूल्य अप्रतिष्ठित करणे म्हणजे मनुवाद गाडणे होय. 

प्रारंभी वैज्ञानिक शोधांची आणि विज्ञानाची भटांना भीती वाटायची. आपले वर्चस्व विज्ञानामुळे नष्ट होईल असे वाटायचे. पण आता तर विज्ञानालाही मनुवादाची कीड लागलेली दिसून येते. एवढेच नव्हे तर, विज्ञानाचाही उपयोग मनुवाद पक्का करण्यासाठी होत आहे.  

संगणक क्षेत्रही मनुवादी उंदरांनी कुरतडलेले आढळते. बहुजनांतील जागतिक किर्तीचा एक मोठा संगणकतज्ञ मनुवादी `भटकरी' बनलेला आढळून येतो. सगळे काही कळत असूनही स्वार्थासाठी बहुजनांतील बरेच विद्वान, संशोधक आणि शास्त्रज्ञ बामणांची मर्जी संपादन करण्यासाठी भयंकर मनुवादी बनलेले आहेत. यज्ञ, व्रतवैकल्ये, सत्यनारायण वगैरेंद्वारे आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अशांचा तिरस्कार करणे म्हणजे मनुवाद गाडणे होय. 

5) राजकीय क्षेत्र आणि मनुवाद
संसद, सर्वोच्च न्यायालय आणि सचिवालय ही भारतातील सर्वोच्च शक्तीकेंद्रे मनुवाद्यांच्या हातात आहेत किंवा नाहीत यावर वाचकांनीच विचार करावा.
प्रा. मा. म. देशमुख लिखित समता आणि मराठा-कुणबी समाजाची दशा आणि दिशा ह्या ग्रंथात यासंबंधीची आकडेवारी व माहिती विस्ताराने दिलेली आहे.
लोकसभा- लोकसभेतील बामण खासदारांची संख्या कमी होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची व्यवस्था करून ब्राह्मण महिला खासदारांचा भरणा करण्याचा कट आहे.
शिवाय सर्वोच्च न्यायालयसुद्धा अधिक हस्तक्षेप करून मनुवाद्यांच्या मदतीला धावून येत आहे, असा आरोप होत आहे. 
मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आपल्या एका मुलाखतीत न्यायव्यवस्थेबद्दल म्हणतात-
``आता न्यायसंस्थेने/सुप्रीम कोर्टाने तर सगळ्यांचे अधिकारच काढून घेतले आहेत. त्यांच्याविरुद्ध तर मोठे आंदोलनच उभे करायला हवे! गजेंद्र गडकरने स्वतचा जावई जज्ज करण्यासाठी तीन वर्षे न्यायाधीश निवड प्रक्रिया प्रलंबित ठेवली. का तर त्यांच्या जावयाला सात वर्षे अनुभव होता. `बामणच जावई तो!' अशी मानसिकता न्याय व्यवस्थेत असेल तर न्यायव्यवस्था बेलगाम होणार नाही तर काय?
``बाबरी मशीद पाडण्यात सुप्रीम कोर्टाचाही हात आहे'', असे 8 जानेवारी 1993 रोजी नागपूर येथील पत्रपरिषदेत कांशीराम म्हणाले. 
केंद्रीय सचिवालयात आणि देशात प्रथम आणि द्वितीयश्रेणी अधिकारी वर्गात बामण आणि तत्सम अधिकाऱयांचाच मोठा भरणा आहे, हे सत्य मंडल आयोगाच्या अहवालाने उघडकीस आणले आहे.
सारांश- मनुवाद गाडण्यासाठी संसद, सर्वोच्च न्यायालय आणि सचिवालय ह्या तिन्ही शक्तीकेंद्रात शिव-फुले-शाहू- आंबेडकरवादी व्यक्तींची नियुक्ती आणि बहुसंख्या अत्यावश्यक ठरते. 

सत्यशोधक चळवळ आणि काँग्रेस
म. फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींमुळे मनुवाद अप्रतिष्ठीत बनू लागला. सत्यशोधकांच्या चळवळीचा फायदा निवडणुकीत काँग्रेसलाच मिळाला. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र सत्यशोधक चळवळीला मदत केली नाही. (ज्यांनी केली त्यांना वंदन). उलट प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नयेत म्हणून सत्यशोधकांना दूरच ठेवले. 

हे वाचा आणि विचार करा- एका भ्रष्ट मनुवादी नेत्याने भ्रष्टाचारात मिळविलेल्या पैशांतून शंभर कोटी रुपये एका `सनातन' वर्तमानपत्राला दिले, असे विश्वसनियरित्या कळले. अशा रितीने मनुवादी गड मजबूत करणारे कितीतरी गडकरी मनुवाद्यांजवळ आहेत. आमच्यात मात्र `सत्यशोधक चळवळ' आणि `संभाजी ब्रिगेड' उद्ध्वस्त करण्यासाठी `टपलेली गिधाडे' आहेत. ह्या `गिधाडांचा बंदोबस्त केला की, मनुवाद गाडणे फार सोपे आहे. 

म. फुले यांचा विचार बहुजन समाजात प्रतिष्ठीत होताच आता काही काँग्रेसवाले म. गांधींऐवजी म. फुले यांचा फोटो लावायला लागले आहेत. ज्यांना संधी मिळाली नाही ते `हेडगेवार-गोळवलकर-गोडसे कपंनीत' दाखल झालेत. 

`कुटुंबवत्सल' काँग्रेस नेते आणि त्यांचा मनुवाद
बहुतेक सगळ्या पक्षांतील सगळ्या जातींतील पुढारी व्यक्ती या नात्याने त्यागी सदाचारी, सज्जन आणि सुस्वभावी आहेत. (अपवाद आहेत) काँग्रेसमध्ये तर चांगले पुढारी बरेच होते आणि आहेत. परंतु बहुजन पुढाऱयांचा मोठेपणा त्यांच्या निर्वाचन क्षेत्रापुरताच मर्यादित आहे.
शिवाय, आपल्यानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तीचीच प्रतिनिधी म्हणून निवड व्हावी अशी मनोवृत्ती आज दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या पुढाऱयांची मनोवृत्ती बनलेली आहे. ही मनोवृत्ती म्हणजे मनुवृत्तीच होय. `इतर पक्षांतही घराणेशाही आहे,' असे घराणेशाहीचे समर्थन म्हणजे `इतर शेण खातात म्हणून आम्हीही खातो. असे म्हणणे होय. 
प्रत्येक जातीतील पुढारी आपल्याच जातीतील इतर कुटुंबातील कुणी पुढे येऊ नये म्हणून इतर जातीतींल व्यक्तींना आपला `उजवा हात' म्हणून निवडतो. जातीत कुणी प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाही अशी खबरदारी घेतो.
परिणामी अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून इतर पक्षांत गेले. त्यांच्यामुळे अनेक दिग्गज पराभूत झाले. भाजप आणि इतर प्रादेशिक पक्ष प्रबळ बनले. ही घराणेशाही मोडून काढणे म्हणजे मनुवाद गाडणे होय. 

विदेशी मुद्दा आणि मनुवाद
श्रीमती सोनिया गांधी विदेशी आहेत म्हणून त्या पंतप्रधान बनू नयेत असा प्रचार भाजप वगैर पक्ष सतत करीत आहेत.
परंतु या विदेशी मुद्याला कोणत्याही काँग्रेसवाल्याने योग्य उत्तर दिलेले दिसत नाही. 
श्रीमती सोनिया गांधी जशा विदेशी आहेत, तसेच बामणसुद्धा विदेशी आहेत.' असे उत्तर कुणीही दिलेले नाही. कारण, काँग्रेससह, भाजप, कम्युनिस्ट वगैरे पक्षांच्या कार्यकारिणीतही बामण आहेत. बामणच त्यांचे मुख्य सल्लागार, सूत्रधार वकील आणि प्रसिद्धीप्रमुख आहेत. 
श्रीमती सोनिया गांधी ह्यांनाही संघप्रणित मनुवादी बामणांनी घेरलेले आहे.

मनुवाद कायमचा गाडण्यासाठी ही सर्व स्थिती बदलण्याची गरज आहे.
शिवभक्ती, मनुवादी मनोवृत्ती आणि जेम्स लेन
शिवरायाने अफझलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यास ठार करून `ब्रह्महत्या पाप आहे', या मनुस्मृतीच्या कायद्याचे तुकडे केले. स्वतचा राज्याभिषेक करून मनुवादाचा मुडदा पाडला. शिवराय हे बामणांचेही मालक होते. त्यांच्या अष्टप्रधानमंडळातील बामण मंत्र्यांचा दर्जा एखाद्या अॅफिसातील चपराश्यासारखा होता.
शिवराय बामणांपेक्षही श्रेष्ठ ही बाब बामण पंडितांना अत्यंत दुःखद वाटत होती. म्हणून त्यांनी रामदास आणि दादोजी कोंडदेव (दादु कोंडाजी कुलकर्णी ) या बामणांना शिवरायांपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यासाठी खोट्या आणि काल्पनिक गोष्टी रचून त्यांचे महात्म्य वाढविले. 
`गागाभट्टाने डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवरायांना टिळा लावणे', `रामदासाच्या झोळीत राज्य टाकणे', अशा कितीतरी खोट्या कथा रचून शिवरायांना दादोजी कोंडदेव आणि रामदासांपेक्षा हलके दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजही चालू आहे.
नमुन्यादाखल जेम्स लेन आणि भांडारकर संस्था प्रकरण थोडक्यात बघू
‡जून 2003 मध्ये `शिवाजी -हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे अमेरिकन लेखक जेम्स लेन याचे चोपडे प्रसिद्ध झाले. परंतु बहुजन समाजाला त्याची माहितीच नव्हती.
‡1977 पासून जेम्स लेनचा भांडारकर संस्थेतील बामणांशी `जिव्हाळ्याचा' संबंध होता.
आपल्या पुस्तकाला मदत केल्याबद्दल लेनने त्यांचे आभार मानले आहेत.
‡7 सप्टेंबर 2003 रोजी अनंत देशपांडे यांचे ह्या पुस्तकाचे परीक्षण सामना दैनिकात प्रसिद्ध झाले.
‡10 नोव्हेंबर 2003 रोजी जयसिंगराव पवार, बाबासाहेब पुरंदरे, बी.जी. मेहंदळे वगैरेंनी पत्रक काढून हे पुस्तक बाजारातून परत घेण्याचे आवाहन केले.
‡21 डिसेंबर 2003 रोजी जेम्स लेनचे गुरु डॉ. श्रीकांत बहुलकर यांना शिवसैनिकांनी काळे फासले.
‡28 डिसेंबर 2003 रोजी शिवसेना नेते राज ठाकरे यांनी पुणे येथे येऊन श्रीकांत बहुलकर यांची माफी मागितली.
‡22 व 29 डिसेंबर 2003 च्या चित्रलेखा साप्ताहिकाच्या अंकांत संपादक ज्ञानेश महाराव यांनी लेन आणि त्यांना मदत करणाऱयांचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळेच लेन प्रकरण बहुजनांच्या लक्षात आले.
‡5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थाला हलकासा फटका मारून निषेध केला. संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर बहादुरांना अटक झाली.
‡संभाजी ब्रिगेडची ही सत्कृती घडली नसती तर हे `भांडारकर-लेन' प्रकरण बहुजन समाजाच्या लक्षातही आले नसते.
‡यापूर्वीच नोव्हेबर 2003 मध्येच डॉ. जयसिंगराव पवार या मराठा इतिहासकारांच्या लक्षात हे `भांडारकर-लेन' प्रकरण आले होते. पण मराठ्यांकडून काही घडणे शक्य नाही किंवा घडू नये असे वाटल्यामुळे 10 नोव्हेंबर 2003 रोजी पत्रकावर सही करून ते शांत बसले असावे.
‡16 जानेवारी 2004 रोजी छ. शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (सहारा) मुंबई येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. त्याप्रसंगी हे वृत्त बघा-
``एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असतील तर दुसरे पुस्तक लिहिणे समजण्याजोगे आहे. परंतु भावना आणि वास्तव यांचा मेळ बसत नसेल तर भावनांचा उद्रेक होऊ देणे किंवा पुस्तकावर बहिष्कार घालणे चूक आहे', अशा शब्दात राज्य सरकार आणि संभाजी ब्रिगेडला पंतप्रधान अटलबिहारी यांनी आज कानपिचक्या दिल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले.'' 
(संदर्भ- दै. लोकसत्ता-17 जानेवारी 2004) 

‡दिनांक 19 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आव्हान देऊन, `विचारांची लढाई विचाराने लढावी', हा त्यांचा मुद्दा खोडून काढला. `टाईम' या मासिकाने वाजपेयी यांच्यावर टीका केली, तेव्हा ते विचारांची लढाई विचाराने का लढले नाही? असा प्रश्न पाटील यांनी वाजपेयींना विचारला.
दि. 20 जानेवारी 2004 रोजी पुणे येथे `जेम्स लेन यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विपर्यस्त व विकृत लेखनास देशातील इतिहास संशोधकांनी लेखणीनेच उत्तर दिले पाहिजे,' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केले.' (संदर्भ-दै. सकाळ दि. 21 जाने. 2004)
अशा रीतीने मनुवाद गाडायला निघालेल्या बहुजनांनी चळवळ दडपून टाकण्यासाठी त्यांचे प्रधानमंत्री आणि कॅबिनेटमंत्री महाराष्ट्रात येतात. देशाचे आणि महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न सोडून संभाजी ब्रिगेडच्या भांडारकर संस्कृतीविरोधात वक्तव्ये करतात. यावरून मनुवादी यंत्रणा आपल्या लोकांच्या रक्षणासाठी कशी धावून येते हे बहुजनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे आणि मनुवाद गाडण्यासाठी सज्ज व्हावे. यापुढे मनुवाद्यांची बाजू घ्याल तर हा संतप्त बहुजन समाज तुम्हालाही मनुवाद्यांसोबत गाडल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव लक्षात घ्यावे.
‡दिनांक 29 मार्च 2004 रोजी आझाद मैदान मुंबई येथील जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले- 
``जनतेच्या आशीर्वादाने केंद्रात पुन्हा वाजपेयी यांचे सरकार बनले तर त्या लेनचा काटा काढण्याचे वचन देतो.''
`जेम्स लेनचे प्रकरण काढून राजकारण कराणाऱयांच्या टाळक्यात भगवा झेंडा हाणा', असा आदेशही ठाकरे यांनी दिला. (संदर्भ- दै. लोकसत्ता 30 मार्च 2004) 
वाजपेयी सरकार सत्तेवर असताना लेनचा काटा का काढला नाही? त्यासाठी पुन्हा वाजपेयी सरकार सत्तेवर यावे एवढा हा काटा मजबूत आहे काय? वाजपेयी सरकार सत्तेवर आणण्यासाठी हे राजकारण नव्हे काय? 

सारांश- महाराष्ट्रातील कुणबी-मराठ्यांच्या मदतीशिवाय कोणत्याही पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकत नाही, हे सगळ्या पक्षांनी ओळखले आहे. परंतु कुणबी-मराठा समाजालाच याची पूर्ण जाणीव झालेली नाही. त्याला जेव्हा ही जाणीव होईल त्या दिवशी महाराष्ट्रातून मनुवाद अरबी समुद्रात बुडून मेलेला दिसेल. 

‡लेन प्रकरणातील खरा गुन्हेगार शिवसैनिकांनी ओळखला
मनुवादाचे वाहक लक्षात यावेत म्हणून लेन प्रकरण थोडक्यात दिलेले आहे.
‡जेम्स लेनचे गुरु डॉ. श्रीकांत बहुलकर यांना काळे फासून शिवसैनिकांनी आपला निषेध नोंदविला. त्यांनी खरा गुन्हेगार ओळखला.
‡परंतु नंतर राज ठाकरे यांनी बहुलकरांची माफी मागून जिजाऊ आणि शिवरायांच्या बदनामीपेक्षा बहुलकर हा बामण श्रेष्ठ आहे, हे दाखवून दिले. न्या. कोळसेपाटील म्हणतात, `ठाकरे कुटुंबाने मागितलेली ही पहिली जाहीर माफी होय.'
‡आर. आर.पाटील - हे तडफदार गृहमंत्री आज पोटतिडकीने जिजाऊ-शिवरायांबद्दल बोलत आहेत. जेम्स लेनबद्दल चीड व्यक्त करीत आहेत. पण फार उशिरा! संभाजी ब्रिगेडला मिळालेले जनतेचे प्रचंड समर्थन बघून हे घडत आहे, प्रधानमंत्री वाजपेयींनेही आपले वक्तव्य फिरविले आहे, असे अनेकांना वाटत आहे. कदाचित पाटील यांना जेम्स लेन आणि भांडारकर संस्था संबंध याबद्दल उशिरा कळल्यामुळे असे घडले असावे.
‡भांडारकर सोडून लेनकडे लक्ष वळविणे हे मनुवादी कुटिल कारस्थान 

बहुजन समाजातील पुढारी, अधिकारी, विद्वान आणि संशोधक हे मनुवादी विचारांचे वाहक आहेत. मनुवादी ब्राह्मणांचे हस्तक आहेत. बामणांनी त्यांना मिंधे बनविले आहे. म्हणून ते बामणांविरुद्ध बोलायला, लिहायला आणि चळवळ करायला घाबरत आहेत. (याला जे अपवाद आहेत त्यांना हे लागू नाही.)
भांडारकर संस्थेविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून शिवभक्तांचे लक्ष लेनकडे वळविण्याचे मनुवादी कुटिल कारस्थान सुरू झाले आहे. भांडारकर संस्थेतील लेनकडून पुस्तक लिहून घेणारे विकृत मनुवादी सोडून अनेकांनी लेनविरुध्द बकवास सुरू केली आहे. भांडारकरी विकृत मनुवाद्यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी रचलेला हा मनुवादी कट होय. ही दिशाभूल होय. सर्वजातीय शिवभक्तांची फसवणूक होय.
बामण पंडितांच्या ताब्यात असलेल्या भांडारकर संस्थेसारख्या सगळ्या संस्था आणि शिक्षणसंस्था यांची शासनाने चौकशी करावी आणि अपराधी सिद्ध झाल्यास कडक कारवाई करावी.  

‡मनुवाद्यांनी भ्रष्टाचाराने मिळविलेले अब्जावधी रुपये आपल्या बँकांच्या तळघरात लपवून ठेवलेले आहेत, असेही कळते. याचाही शासनाने शोध घ्यावा. पण शोध घेणारेही `त्यांचेच भाऊ' असतील तर सत्य कसे उघडकीस येईल? आता जनतेनेच त्यांचा `वेध' घेणे आवश्यक आहे. 

‡काँग्रेसी राज्यकर्ते
महाराष्ट्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेडच्या सत्कृतीचा खूप फायदा होणार आहे. राज्यकर्त्यांचे जिजाऊ-शिवरायांवर खरेच प्रेम असेल तर 1) त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर बहाद्दरांवरील खटले ताबडतोब मागे घ्यावेत.
2) प्रत्येक बहाद्दराला पाच लाखांचा पुरस्कार देऊन सन्मान करावा.
3) शासकीय नोकरीत त्यांना सामावून घ्यावे.
‡भांडारकर संस्थेला मदत करण्यासाठी भटांचा सारा समाज धावून आला.सरकारही धावून आले. पण आमच्या बहात्तर बहाद्दरांना वाऱयावर सोडले. भटांची साहित्य संमेलने, कुंभमेळा वगैरेंसाठी गोरगरीब जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी करणाऱया या सरकारने किंवा येत्या सरकारने जिजाऊंच्या सन्मानासाठी लढलेल्या बहाद्दरांचा योग्य सन्मान केला नाही तर, सर्व जातीय शिवभक्त जनता त्यांना माफ करणार नाही.
ह्यांना कुणबी-मराठ्यांची मते हवीत
कुणबी-मराठ्यांतील सज्जन आणि श्रीमंत व्यक्तींना खासदारकीचे तिकीट देतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि सेवेकडे कुणबी-मराठा समाज आकर्षित करून आपल्या पक्षाच्या खासदारांची संख्या वाढवितात. पण हे खासदार कितीही सज्जन असले तरी त्यांनी मनुवादी धोरणाला आणि अंदाजपत्रकाला संमती देण्यासाठी `हातवर करावा' एवढेच मुख्य काम असते. शेतकरी, कष्टकरी बहुजनांच्या हिताचे कायदे लोकसभेत संमत करवून  घेण्याची त्यांच्यात हिंमत नसते आणि तशी त्यांची कुवतही नसते. 

सडलेला मनुवाद गाडण्यासाठी शिव-पुले-आंबेडकर चळवळ
सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रांत मनुवाद पसरलेला आहे. म्हणून ह्या प्रत्येक क्षेत्रांत बहुजनोद्धारक महापुरुषांच्या विचारांवर आधारलेल्या चळवळी उभाराव्या लागतील. ह्या चळवळी सरकारी कृपेशिवाय उभ्या करणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यशासनाची मनुवादी धोरणे, कायदे, साम्राज्यवादी देशांचे हस्तक्षेप हाणून पाडण्यासाठी समर्पित कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करावी लागणार आहे.
आता केवळ मनुवाद्यांचे दोष आणि कृत्ये सांगून रडत बसणे सोडावे लागेल. आता सर्वांना लढावे लागेल. त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करावे लागतील. पदलोभी, प्रसिद्धीलोलुप, स्वार्थी, ढोंगी आणि भ्रष्ट कार्यकर्ते आणि पुढारी यांच्यापासून संघटन वाचवावे लागेल. असे केले तरच हा सडलेला मनुवाद गाडून टाकणे शक्य होईल. म्हणून बहुजन जोडा आणि मनुवाद गाडा. संघटित व्हा समर्पित व्हा! 

भेदांना मिटवा, भटांना हटवा, भारताला वाचवा!
`मनुवाद मुर्दाबाद' `मानवतावाद झिंदाबाद'!! 

( पुर्व प्रकाशित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com