Top Post Ad

भीमा-कोरेगाव परिसरात लावण्यात आलेले कलम १४४ त्वरीत मागे घ्यावे

दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभास मानवंदना अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. या वर्षी आलेल्या कोरोना महामारीचे निमित्त करून विद्यमान सरकारने या परिसरात जमावबंदी आदेश कलम १४४ लागू केला आहे. आज कोरोना सर्वत्र आटोक्यात असल्याचे चित्र असल्याचे सरकारच सांगत आहे. एकीकडे सर्व प्रार्थनास्थळे उघडी असताना याच ठिकाणी जमावबंदी आदेश का असा सवाल ठाण्यातील आंबेडकरी जनतेने केला आहे. याबाबत ठाण्यातील विविध पक्षाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी आपली भूमिका विषद केली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष सुरेशदादा पाटीलखेडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे ठाणे प्रवक्ते चंद्रभान आझाद, ब्ल्यू-पँथर सामाजिक संघटनेचे रविंद्र शिंदे तसेच बहुजन समाज प्रबोधिनीचे प्रमोद इंगळे आदींनी आपले मत व्यक्त केले.

आपली भूमिका मांडताना सुरेशदादा पाटीलखेडे म्हणाले,  पुणे जिल्हयात कलम १४४ दिनांक २८/१२/ २०२० ते ०२/ ०१/ २०२१ पर्यंत जिल्हाधिकारी यांनी लागु केलेला आहे . भीमाकोरेगाव  आणि वढू बुद्रुक येथे बहुजन समाजातील तळागाळातील सुजाण जनता छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र राजे संभाजी महाराज आणि त्यांचा अंतिम संस्कार करणारे सिद्धार्थ गायकवाड यांच्या स्मरकास नत-मस्तक व स्मरण करण्यासाठी संपूर्ण देशाच्या काना-कोपऱ्यातून श्रद्धेपायी लाखोंच्या संख्येने जन समुदाय आप-आपल्या परीने सहभागी होण्यासाठी भीमा-कोरेगाव येथें  येतआहेत. सन २०१७ /१८ मध्ये राज्यात भाजप सेने च सरकार असतांना जातीपातीचे आणि धार्मिक भावना भडकावुन ब्राह्मणवादी (आरएसएस)च्या फडणवीस यांनी भिमा-कोरेगाव येथील जनसमुदाया वर अमानुषपणे संभाजी (कुलकर्णी ) भिडे, हिंदूच्या नांवे संघटना चालविणारे मिलींद एकबोटे यांनी धारकरी अनुयायांना हाताशी धरून दंगल घडविण्याचा प्रताप केलेला आहे.  परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतांना प्रशासन मात्र कोरोना १९ च्या नावाखाली भोळ्या-भाबड्या शांती आणि अहिंसेच्या मार्गाने अभिवादन करण्यासाठी येणाऱ्याच्या समोर अनेक अडचणी निर्माण करीत आहेत.   आज रोजी महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासन कलम १४४ लागू करून जनतेला चुकीचा सरकार विरोधी संदेश देण्याचे काम जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोपही पाटीलखेडे यांनी केला. 

   महत्वाचे असे की भाजपचे नेते मंडळी पुण्यात खुलेआम शेतकरी आंदोलन विरुद्ध जाहीर सभेचे आयोजन करीत आहेत. त्यांना परवानगी शिवाय कार्यक्रम आयोजित करण्यास कोण मदत करीत आहेत?  याचा विचार होणे आवश्यक आहे .तळागाळातील जनतेत आपल्या सरकार बाबत गैरसमज निर्माण होत आहेत . भीमसैनिक, दलितबांधव ,आदिवासी , ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज गेल्या २००वर्षा पासून शांतता पूर्वक मार्गाने भीमा-कोरेगाव येथे आप -आपल्या परीने भावना व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धेपायी अभिवादन करण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतांना प्रशासनातील काही लोक त्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करीत आहेत . राज्यातील जनता ही सोशिक आहे प्रथम ते छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी राजे , छत्रपती शाहू महाराज , महात्मा जोतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच अनुयायी आहेत .शासनाने त्वरित निर्णय घेऊन कलम १४४ मागे घेण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत आणि बहुजन वंचिताचा आदर करून सहकार्य करून त्यांना विश्वास देऊन महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी मजबुत असल्याचा पुन्हा परिचय करून द्यावा .अशी मागणीही पाटीलखेडे यांनी केली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी समजून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र द्यावे जेणेकरून यापुढे अशा प्रकारांना आळा बसेल

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com