Top Post Ad

५० टक्के रोख व ५० टक्के वस्तुच्या स्वरूपात चार हजार एवढी रक्कमेची खावटी अनुदान योजना

ठाणे
:ठाणे जिल्हयातील  आदिवासी बांधवांना  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान योजना (सन २०२०-२१) या एका वर्षाकरीता सुरु करण्यात आलेली आहे.सदर योजनेची अंमलबजावणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जि.ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

खावटी अनुदान योजनेकरीता पात्र लाभार्थ्यांना रु.४०००/- एवढी रक्कम शासनामार्फत ५० टक्के रोख स्वरूपात व ५० टक्के वस्तुच्या स्वरूपात मिळणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्हयातील योजनेकरीता पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व अर्ज भरुन घेण्याकरीता प्रकल्प कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह कर्मचारी यांनी गावे, पाडे, वाड्यामध्ये वारंवार जावून आदिवासी बांधवांना योजनेची माहिती देवून प्राप्त लाभाथ्थ्यांची निवड करून त्यांचे अर्ज भरून घेतलेले आहेत.

*खावटी अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी निकष*
 मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर (दि. ०१ एप्रिल, २०१९ ते दि. ३१ मार्च, २०२० या कालावधीतील किमान एक दिवस), आदिम (कातकरी) जमातीचे सर्व कुटुंबे, पारधी जमातीचे सर्व कुटुंबे,  गरजू आदिवासी कूटूंबे ज्यामध्ये परितकत्या, घटस्पोटित महिला, विधवा, 'भूमीहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, कुमारी माता, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब,  वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्क धारक कुटुंबे अशा व्यक्तींना लाभ घेता येईल. 

*खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे*
कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जातीचा दाखला,शिधापत्रिका (रेशनकार्ड) लाभाथ्यांचे आधार कार्ड, डाक खाते/ बँकेचे पासबुक प्रत, लाभार्थी मनरेगावर (दि.०१.०४.२०१९ ते दि.३१.०३.२०२०) या कालावधीत किमान एक कामावर कार्यरत  असल्यास त्याचा मनरेगा जॉब कार्ड प्रत, वैयक्तिक वनहक्क धारक असल्यास वनहक्क पट्टे वाटप झाल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अंपग प्रमाणपत्र (किमान ४० टक्के,भूमीहीन असल्यास रक्षम अधिकारी यांचा दाखला (तलाठी अथवा तहसिलदार), घटस्पोटित असल्यास कायदेशीर घटस्पोट झाल्याचे प्रमाणपत्र, 
 विधवा असल्यास पती मयत झाल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषणा पत्र, परितक्ता असल्यास गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा दाखला/स्वयंघोषणा पत्र,  कुमारी माता असल्यास गावातील सरपंच किंदा पोलीस पाटील यांचा दाखला. 

 नमुद केलेल्या निकषापैकी काही लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याचे राहिले असतील त्यांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर येथे भ्रमणध्वनी- ७७५७८०३१५७ संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com