Trending

6/recent/ticker-posts

हा तर ओबीसींच्या स्वयंघोषित नेत्यांना सत्तेचं गाजर दाखविण्याचा प्रयत्न - सुरेशदादा पाटीलखेडे


ठाणे
 देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढील भाजपची वाटचाल धोक्यात आली आहे . म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील कालबाह्य झालेले आणि महाराजांच्या पायाची सर नसलेले भटा-बामणी पाशात पूर्ण अडकलेल्या  (सत्तेपायी ) बहुजनाना वाऱ्यावर सोडून तलवारीची भाषा करून थंड झाल्यावर या भाजप नेत्यांच्या लक्षात आले की मराठा समाज आपल्या सोबतीला थांबणार नाही.  म्हणून त्यांनी आज पक्ष कार्यकारिणी च्या कार्यक्रमात ओबीसींच्या स्वयंमघोषित नेत्यांना सत्तेचं गाजर दाखविण्याचा प्रयत्न  सुरू करण्याचे आदेश दिले आहेत .देशातील शेतकरी विरुद्ध काळे कायदे करणाऱ्या भाजपाला राज्यात मदत होईल असे काहीही करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष, तथा ओबीसी जनआक्रोश मोर्चाचे समन्वयक सुरेशदादा पाटीलखेडे यांनी सर्व ओबीसी समाजातील जाणत्या नेत्यांना केले आहे.

  भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीची नुकतीच बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा फडणवीस यांनी दिला. यावर प्रतिक्रिया देतांना पाटीलखेडे बोलत होते. 


ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटविण्याचा भडकविण्याचा आरएसएस भाजप  पर्यन्त करणार यात किंचितही शंका नाही.  केंद्रात मोदी -शहा यांना कोणत्याही सवर्णांनी आरक्षणाची मागणी केली नसतांना संसदेत 10 % टक्के आरक्षणाची मंजुरी दिली परंतु मराठा समाजाने  58 मोर्चे काढून ही त्यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले आणि तेथेही कायमची खुंटी मारून ठेवली आहे तरीही आमचे अंध भक्त मोदी - शाहची आरती ओवाळणी करण्यात सत्तेसाठी लाचार झाल्याचे चित्र महाराष्ट्र राज्यात पहावयास मिळत असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.  २०१४ पासून कोपर्डी बलात्काराच्या मुद्द्यावरून मराठा मोर्चाला भाजपने आणि आर एस एस ने खतपाणी घालून (महाराष्ट्र राज्य शासनाने ) अगोदर हिंदू आणि मुस्लिम यांच्या नावे वाद विवाद निर्माण करून खोटी आश्वासन देऊन केंद्रात सत्ताधारी बनले  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्याला पेटवत ठेऊन तरुण - तरुणींना आणि मराठा राजकीय प्रस्थापित दुसऱ्या पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय इन्कम' टॅक्स ची भीती दाखवून भाजपमध्ये सामील करून राज्याच्या निवडणूक लढवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र हाती अपयशच आलं.

       दुसरी बाजू म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी व इतर असा नियोजित ऍक्शन प्लॅन (ब्लु - प्रिंट )तयार ठेऊन न्यायालयीन संघर्षाची जुगलबंदी घालण्यात यशस्वीपणे वाटचाल सुरू करण्यात आली .जेंव्हा आपलं सरकार राज्यात ऐन-केन ,फोडाफोडी घोडा बाजार आणि संविधानाच्या कक्षेत न बसणाऱ्या सर्व गोष्टी करूनही सत्ता प्रस्थापित होत नाही हे लक्ष्यात आल्यावर आणि महाविकास आघाडीला (सेना , राष्ट्रवादी , काँग्रेस ) यांना एक वर्ष पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनतेने प्रामाणिकपणे योग्य ते सहकार्य केले आहे. कोरोना 19 मुळे सारे जग अंधारात चाचपडत असतांना राज्यातील अनेक जाती धर्माच्या सामाजिक संस्थांनी आपल्या परीने सढळ हातांनी मदतीचे काम चोख केलेले आहे. त्या मध्ये भाजप  आणि आर एस एस कोठेही दिसली नाही हे त्रिवार सत्य आहे . कोविड असतांना महाआघाडीच सरकार कसे घालवायचे हा प्रयत्न प्रामाणिकपणे भाजपाने कसे केले हे साऱ्या भारताने पाहिले आहे. आता नुकत्याच झालेल्या विधान परिषद शिक्षण , पदवीधर , मतदारसंघात निवडणुकीचा निर्णयाने भाजपचं सार बेरजेचे राजकारण जनतेने रस्त्यावरच आणून ठेवलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्याशिवाय यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. यासाठी ओबीसी आणि मराठामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आरएसएसच्या माध्यमातून फडणवीस करीत असल्याची शंका पाटीलखेडे यांनी व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments