ठाणे - मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशीही केली होती. त्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे विहंग सरनाईक हे रुग्णालयात होते. त्यामुळे तेही चौकशीला हजर नव्हते. पण, आता ते वडिलांसोबत येत्या गुरुवारी ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहे. ईडी चौकशीत काही कारवाई केली तर ही मोठी घडामोड ठरणार आहे.
दरम्यान, ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल सादर केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे. एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
0 टिप्पण्या