ग्लोबल इम्पॅक्ट हबचे कायमस्वरूपी रूग्णालयामध्ये रूपांतर करा-  नारायण पवार

ग्लोबल इम्पॅक्ट हबचे कायमस्वरूपी रूग्णालयामध्ये रूपांतर करा-  नारायण पवारठाणे महापालिकेनं ग्लोबल इम्पॅक्ट हब मध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या १३०० खाटांच्या रूग्णालयाचे कायमस्वरूपी रूग्णालयामध्ये रूपांतर करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. कळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाला उभारून ३० वर्ष झाली असताना नवीन रूग्णालय ही काळाची गरज आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी १ हजार २४ खाटांचं रूग्णालय उभारण्यात आलं. नंतर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या शक्यतेनं त्यांची संख्या ३०० ने वाढवण्यात आली. सध्या हे रूग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठं रूग्णालय आहे. कोरोनाची आपत्ती ओसरल्यावर तात्पुरत्या स्वरूपाचं रूग्णालय बंद केलं जाण्याची शक्यता आहे.


 मात्र जिल्ह्याची सार्वजनिक आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली असताना दर्जेदार सरकारी रूग्णालयाची गरज आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाची क्षमता अवघी २५० रूग्णांची असताना अनेक रूग्णांना कळवा रूग्णालय अथवा मुंबईतील रूग्णालयात पाठवावं लागतं. कळवा रूग्णालयाची दुरूस्ती करावी लागणार आहे. ठाण्याची लोकसंख्या २५ लाखांवर गेली असताना केवळ ५०० रूग्ण क्षमतेचे महापालिकेचे रूग्णालय अपुरं पडणार आहे. सध्या ग्लोबल हब येथे उभारलेलं हॉस्पिटल कायम ठेवल्यास त्याचा रूग्णांनाही फायदा होईल. यासाठी या रूग्णालयाचा कायमस्वरूपी रूग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA