Top Post Ad

ऐन दिवाळीत कोरोना संख्येत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

ऐन दिवाळीत कोरोना संख्या दोन आकड्यात 
मृत्यू दर २.३१ तर डिस्चार्ज दर ९५ टक्क्यांवर
नागरिकांनी काळजी घेण्याचे महापौर, महापालिका आयुक्त यांचे आवाहन



ठाणे
          गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा सरासरी १५० इतका आहे. तथापि ऐन दिवाळीच्या काळात गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या दोन आकड्यात येत आहे. दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी ही संख्या ७७ इतकी होती तर आज १६ नोव्हेंबर २०२० रोजी हा आकडा ९५ इतका आला आहे.  ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून ऐन दिवाळीत ही संख्या दोन आकड्यांवर आली आहे. बाधित होण्याचे प्रमाणही आता ८.३९ वर आले असून डिस्चार्ज दर हा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान कोवीड १९ आटोक्यात आला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे. 


 महापालिकेच्यावतीने चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली नसून कोवीड१९ ची साथ नियंत्रणात असतानाही महापालिका सरासरी ५५०० ते ६००० पर्यंत चाचण्या करीत आहे.  काल दिनांक १६ नोव्हेंबरपर्यंत साधारणत: ५ लक्ष ७७ हजार २५७ इतक्या चाचण्या महानगरपालिकेने केल्या आहेत. त्यामुळे योग्यवेळी बाधित व्यक्तींवर उपचार करणे सोयीचे झाले आहे. सद्यस्थितीत ठाणे शहराचा मृत्यूदरही कमी होत असून तो आता २.३१ इतका झाला आहे तर कोरोना मुक्त रूग्णांचे प्रमाण हे जवळपास ९५ टक्क्यावर पोहोचले आहे. महापालिकेच्यावतीने कोरोना कोवीड १९ ला नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययजना करीत असून नागरिकांनी ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.  नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन करतानाच कामासाठी बाहेर पडायचे झाल्यास विना मास्क बाहेर पडू नये, योग्य अंतर ठेवावे आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा असे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com