बेस्ट प्राइजची किरकोळ विक्रेत्यांना बक्षिसे 

बेस्ट प्राइजची किरकोळ विक्रेत्यांना बक्षिसे 


 


मुंबई,
बेस्ट प्राइजमध्ये सवलती, खास सूट, रोख रककम, अशा अनेकविध बाबींमधून किरकोळ विक्रेत्यांना खरेदी करण्याची व्यापक संधी दिली असून यात भाग्यविजेता एक नशिबवान विजेत्याला मर्सिडीज कार मिळणार आहे तर तब्बल 29 विजेत्यांना बजाज पल्सर 125cc बाइक मिळणार आहे.  फ्लिपकार्ट बेस्ट प्राइसमुळे छोट्या किराणा दुकानदारांना उत्तम किमतीला माल विकता येतो तसेच मर्चंडायझिंग, प्रोडक्ट प्लेसमेंट आणि बाजारपेठेची माहिती अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर इतरांकडूनही माहिती मिळवता येते. या उत्सव काळातील मोहिमेमुळे छोट्या रीटेलर्सना त्यांच्या गिफ्टिंग आवश्यकता पूर्ण करणे आणि आकर्षक बक्षिसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


सर्व विजेत्यांमध्ये असलेला एक समान धागा म्हणजे हे सगळे फ्लिपकार्टच्या बी2बी व्यवसायाचे सदस्य आहेत आणि आपल्या दुकानातील उत्सव काळातील मालासाठी खरेदी करणारे हे सगळे छोटे रीटेलर्स आहेत. यंदा बेस्ट प्राइजने दिवाळी बोनान्झाचा कालावधी मागील वर्षीच्या 10 दिवसांऐवजी 20 दिवसांपर्यंत वाढवला आहे. मागील वर्षी फक्त वॉक-इन स्टोअरपुरता मर्यादित असलेला हा बोनान्झा आता ई-कॉमर्ससाठी उपलब्ध आहे. बेस्ट प्राइज़ बाजारपेठेने फॅशन विभागात 16 शहरांमध्ये या उत्सवाच्या काळात आकर्षक सवलतीही देऊ केल्या आहेत. अमरावती येथील 2 किरकोळ विक्रेत्यांनाही भाग्यवीजेता म्हणुन घोषित करण्यात आले. त्यांना रोख रक्कम आणि दुचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई येथील शिवाजी नगर येथील कपडा व्यावसायिक समशाद खान याने बेस्ट प्राइज ई कॉमर्स व्यासपीठवरून खरेदी केल्यामुळे उत्पन्नाात वाढ झाली असल्याचे मत व्यक्त केले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad