हा तर टीआरपी वाढवण्याचा मार्ग

हा तर टीआरपी वाढवण्याचा मार्गमुंबई
२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे राज्यघटना बदण्याची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे या शो मध्ये असा प्रश्न विचारण्यात येण्यामागचे काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय  हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून आपला टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न सोनी टिव्हीने केला असल्याचा आरोप ब्ल्यू पँथरचे एस रविराज यांनी केला आहे. . 


 बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’मधील स्पर्धक तसंच आपल्या सूत्रसंचालनामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोरोनामुळे अनेक श्रमजिवी लोकांचे रोजगार बुडाले असताना कोरोना अनलॉक होताच कौन बनेगा करोडपती मार्फत अमिताभ बच्चन यांनी मात्र आपल्या कामाला सुरुवात केली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या शोच्या निमित्ताने चाहत्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळत असते. या आधीही अनेक वेळा हा शो चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि सर्वसामान्यांची बिघडलेली आर्थिक परिस्थितीती यामुळे केबीसीचा घटणारा टीआरपी वाढवण्यासाठीच असा वादग्रस्त प्रश्न निर्माण करण्यात आला आणि त्याला प्रसिद्धी देण्यात आली असल्याचे मत धारावीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांनी व्यक्त केले.  दरम्यान कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात मात्र तक्रार करण्यात आली आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA