Top Post Ad

६ नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरु

६ नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरु



मुंबई
काही दिवसांपूर्वी केंद्र सराकारच्या परवानगीनंतर राज्यातील सिनेमागृह कधी सुरु करणार यांसदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, 'सिनेमागृह सुरु करण्याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी मौसम असतो, त्यामुळे चित्रपगृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून लकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत', असे त्यांनी सांगितले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात आतापर्यंत चित्रपटगृहे बंद होती. पण आता 24 तासांच्या आत महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबत 6 नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरु करण्यात येणार आहेत. चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे थिएटर मालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. याकाळात अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. आता चित्रपगृहे सुरु होणार असल्याने थिएटर मालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. चित्रपटगृहे सुरु करण्यासंबंधी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली लागू करण्यात आली आहे. चित्रपटगृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे. चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. आसनव्यवस्था राखीव ठेवता येणार नाही. प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावे.  आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा.  थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे.  फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com