मे. विजया कंस्ट्रक्शन आणि पाणी पुरवठा विभागाच्या संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल


मे. विजया कंस्ट्रक्शन आणि पाणी पुरवठा विभागाच्या संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल

 


 

ठाणे

ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदाराने सदर कामगारांना अनेक महिन्यांचे वेतन ही अदा केलेले नाही. तसेच सदरचा ठेकेदाराने सदर कामगारांना कधीही किमान वेतन कायद्यानुसार वेतन व भत्ते अदा केले नाही. किंबहूना पी एफ, ईएसआयसीची सुविधा देखिल दिलेल्या नाही.  पाणी पुरवठा विभागातील अधिकारी त्याला पाठीशी घालण्याचा अतिशय निंदनीय कृत्य करून ठेकेदाराला ६० टक्के लेव्ही सहित किमान वेतन कायद्यानुसार वेतन व भत्ते लागू अदा करून ही कामगारांना फक्त रूपये दहा हजार महिना पगार देऊन कामगारांचे शोषण करीत आहे. 

 

या बाबतीत वेळोवेळी कामगारांनी तक्रार केली आहे.  मात्र किमान वेतन कायद्यानुसार वेतन व भत्ते मागितले म्हणून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे.  बोनसची कायदेशीर रक्कम देखील सदर ठेकेदार कामगारांना अदा करणार नाही. योग्य ती कारवाई करून सदर कामगारांना बोनसची रक्कम मिळावी याकरिता श्रमिक जनता संघाच चिटणीस जगदीश खैरालिया यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विनंती केली आहे. पाणी पुरवठा विभागातील कंत्राटदार मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी व कळवा प्रभाग समिती मधील पाणी पुरवठा विभागचे अधिकारी यांची मिलीभगत बाबतीत निष्पक्ष चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.


  
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad