८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा

 

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी पुणे येथे दिली. या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, तरुण, महिला, शेतकरी सहभागी होणार आहेत.  तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महावितरण भरती प्रक्रियेवेळी सामावून घेणार अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतली हाेती. परंतु भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातील मुलांना डावलण्यात आले. त्यामुळे वगळलेल्या मुलांच्या पालकांसमवेत प्रत्येक जिल्ह्यात महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमाेर एक आणि दोन डिसेंबर रोजी निदर्शने करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे, असेही कोंढरे यांनी सांगितले.

पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा, आरक्षण स्थगिती, शैक्षणिक प्रवेश, नोकरभरती, समांतर आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत पुढील आंदोलन ठरवण्याच्या दृष्टीने राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विविध संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बोलत होते. बैठकीस तुषार काकडे, धनंजय जाधव, सचिन मोरे, संजीव भोर (पुणे), रवी माने, माउली पवार ( सोलापूर), गंगाधर काळकुटे (बीड), वीरेंद्र पवार, राजन घाग, अंकुश कदम, प्रफुल्ल पवार ( मुंबई), दिलीप पाटील (कोल्हापूर), प्रशांत पाटील, डॉ. संजय पाटील ( सांगली), रवी पाटील (औरंगाबाद), तुषार जगताप, रवी सोलकर (नाशिक), उदय पाटील ( लातूर), सुहास सावंत ( सिंधुदुर्ग), विनोद साबळे (रायगड) उपस्थित होते.

ज्या लोकांनी तुम्हाला मानपान दिला, विश्वास ठेवला. ‘मराठा स्ट्राँग मॅन’ अशी उपाधी दिली. त्यांचा विश्वास उडाला तर हेच लोक तुम्हाला खाली खेचू शकतात,’अशा शब्दात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी उदयनराजे यांनी रविवारी जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारांंचे नाव न घेता कडक शब्दात टीका केली. तसेच आरक्षण प्रश्न मार्गी न लावल्यास मराठा समाजाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

मराठा आरक्षण वगळून भरती प्रक्रिया राबवू नये, या मागणीसाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातून सुद्धा मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. दरम्यान, या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.   11वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. बुधवारी (दि.2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती हजर राहणार आहेत.यामध्ये मराठा समाजाचे समन्वयक तसेच अभ्यासक सुद्धा उपस्थित राहतील. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने होण्राया बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.  

इयत्ता 11 वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपर न्युमेररी पद्धतीने एसईबीसीत मराठा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने समावेश करण्यात येईल, यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मराठा समाजाची आक्रमकता पाहून उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1