Top Post Ad

गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ

 गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक 
दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची रविवारी पार पडली बैठक 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल

पनवेल 
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत गेले कित्येक वर्षे सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे आता आरपारची लढाई सुरू केली आहे. रविवारी शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाठपुराव्याला आता ठाकरे सरकारच्या माध्यमातून यश मिळत आहे. आज पार पडलेल्या सभेमध्ये महत्वाचा ठरलेल्या विषयांमध्ये नवी मुंबई आणि रायगड मधील पनवेल उरण पट्ट्यातील गरजेपोटी बांधलेली घरं कायम करण्याचा मानस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेऊन गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत प्रथम सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरजेपोटी किती घरे बांधली आहेत त्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी तत्काळ रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भूसंपादन अधिकारी यांना सांगून एक महिन्याच्या आत याची माहिती देण्यासाठी पहिली बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी दिली. 

यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये बबनदादा पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, पनवेल आणि उरणसाठी दोन कोविड रुग्णालये मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी उरणमधील कोविड रुग्णालय जनतेसाठी प्रशासनाच्या हाती आलं आहे. तर पनवेलमधील रुग्णालय १५ दिवसात प्रशासनाच्या ताब्यात येईल अशीही माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच यामध्ये ८० खाटा आणि ५० व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यात आली आहे. या बाबत सर्वात मोठे श्रेय हे स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गरजेपोटी बांधलेली घरे कायम ठेवण्यासाठी समितीमार्फत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येणार असल्यामुळे याबाबत पहिली बैठक खारघर येथे शिरीष घरत यांच्या कार्यालयामध्ये पार पडणार असून खारघर परिसरातील जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच यापद्धतीने दुसरी बैठक तळोजा येथे, तिसरी कामोठे येथे बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने माहिती देण्यात आली. या पार पडलेल्या सभेमध्ये माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळूशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोइर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील, समितीचे सचिव सुदाम पाटील, आर.सी. घरत, गणेश कडू, हेमराज म्हात्रे आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com