खरात आणि फडणवीस यांच्या गायकीतला फरक आणि आरक्षण


कडूबाई खरात (एस.सी.) या मागील चार-पाच वर्षात प्रसिद्ध झालेल्या गायिका आहेत. त्यांना कुठेही मीडिया भेटलेला नाही त्या सोशल मीडियातून मोठ्या झालेल्या आहेत. लोकांनी त्यांना सोशल मीडिया वरती व्हिडिओ बघून लाईक केलेले आहे.
अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी आहेत
"अमृता , खर मेरीट असलेल्या गायकांना तु जगू दे" अशी म्हणायची वेळ आली आहे कारण त्यांनी तिला जगू द्या हे गीत गायलेल आहे. या गीताला यु ट्युब वर 6 हजार 300 likes तर 43 हजार dislike मिळालेली आहेत. अमृता मधे (General) मेरीट नसून देखील तिला T- series गायला संधी देते.
कडूबाईच गाणं स्वतःहून लोकांनी लाईक केल...लाखो लोकांनी शेअर केल होत,न्युज चॅनल्स मुलाखत घ्यायला स्वतः हून आले होते. कडूबाई खरात यांचा आवाज खूप छान आहे त्यांच्या जबरदस्त आवाजामुळे त्यांना लवकरच लोकप्रियता मिळाली. कडूबाई खरात यांच्याकडे कुठलेही अत्याधुनिक म्युसीकल साहित्य नाही,ती पञाच्या घरात राहते. जातीच नेटवर्क नाही. नवरा मुख्यमंत्री नव्हता. अस्पृश्य जातीत जन्माला आली. जातीय अपमान सहन करत जगत आली.
अमृता फडणीस यांचा आवाज एवढा छान नाही पण त्यांच्याकडे राजकीय पाॅवर आहे .अमृताकडे अत्याधुनीक म्युझिक साहित्य आहे. आटो ट्युन फ्टवेयर मधून आवाज चांगला करून मिळतो, कित्येक म्युसिक डायरेक्टर मार्गदर्शन करायला सेवेत आहेत. मोठ्या म्युसिक कंपनी अमृताला डोक्यावर घेऊन नाचतात. नवरा मुख्यमंत्री होता. ब्राह्मण घरात जन्माला आली. सगळीकडे पैसा ,जात,सत्ता याच नेटवर्क आहे.
सगळ्या क्रिम क्षेत्रात जातीय नेटवर्क मुळे खऱ्या मेरीटला संधी मिळत नाही, अमृता सारखे डंब लोकांना संधी मिळते म्हणून खर टॅलेन्ट,मेरीट साठी आरक्षण असते.
आणी हो... कडूबाई खरात यांच्याकडे कोणती पॉवर नाही .त्या गरीब घरात जन्मलेल्या आहेत. बाबासाहेबांचे गाणे गाऊन त्या त्यांच्या मुलीचा आणि त्यांची उपजीविका भागवतात.
पूर्वीच्या काळी शिक्षणाला सुद्धा बंदी होती. त्यांचा खूप छळ केला जात होता . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सगळ्यांना समानता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष ही मुल्य दिली. या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी मोठी समाजाच प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेले आहे.
मात्र अमृता फडणवीस यांना कोणत्याही प्रकारची गुलामी करावी लागली नाही किंवा त्यांना उच्च-नीच या गोष्टींचा फरक पडलेला नाही. अमृता फडणीस यांना सहज शक्य आहे व्यासपीठ उपलब्ध होण.
आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आज बर्यापैकी समजलं असेल की आरक्षण हे जातीवर आधारित नसून ते एखाद्या वंचित , मागासलेल्या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची दिलेली संधी आहे.
अमृता आणी कडूबाई हे येथील समाजव्यवस्थेच चित्र आहे
2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA