Trending

6/recent/ticker-posts

संविधान गौरव दिनानिमित्त शासकीय कार्यालयांना संविधान भेट

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचा अनोखा उपक्रम

खेड -- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी यांच्या मार्फत २६ नोव्हेंबर २०२० ते २६ जानेवारी२०२० असा संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. यांच कार्यक्रमाची  सुरवात म्हणून आज खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यअध्यक्ष सचिन गोवळकर यांच्या हस्ते संविधान भेट देण्यात आले. अनिसच्या या उपक्रमाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे. यावेळी अंनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर, शाखा कार्यअध्यक्ष सचिन शिर्के, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प संदिप बडबे, रोहिणी अवघडे आदी मान्यवर सोबत होते.

मा. आमदार योगेश कदम साहेब,-263 दापोली-खेड-मंडणगड विधानसभा संघ, मा. अविशकुमार सोनोने  - उपविभागीय अधिकारी खेड , मा. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे  , मा. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की , मा. गटविकास अधिकारी खेड अरुण जाधव  , मा. मुख्याधिकारी नगर परिषद खेड प्रसाद शिंगटे  , मा. गट शिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण,  मा. तालुका कृषी अधिकारी उत्तम संघभोर या अधिकाऱ्यांना संविधान देण्यात आले.  अंनिसने वित्तीय साक्षरता केंद्रला भेट देऊन तेथील कर्मचारी यांना अंनिसचे संदिप गोवळकर यांनी संविधान आपली जबाबदारी व आपली कर्तव्ये समजवून सांगितले. 

या वेळी माध्यमांशी बोलतांना अंनिस शाखा खेडचे वैज्ञानिक जाणीवा प्रमुख संदीप बडबे म्हणाले की संविधानामुळे सर्व नागरिकांना समान नागरी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, मिळाले आहे म्हणून सर्वानी संविधानाचा आदर केला पाहिजे व  कृती केली पाहिजे.  अंनिस खेड शाखेचे कार्यअध्यक्ष  शिर्के म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकांसह समानतेची शिकवण त्याच बरोबर आपले हक्क आणि कर्तव्य या विषयावर जागरूकता प्रत्येक नागरिकाने बाळगली पाहिजे. वित्तीय साक्षरताचे संस्थापक अवघडे म्हणाले की, आपला देश संविधानवर चालते. संविधानाने आपल्याला भारतभर फिरण्याचा, राहण्याचा, व्यवसाय करण्याचा, विचार करण्याचा, मत मांडण्याचा, श्रद्धेचा, उपासनेचा, न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे, दर्जाची व संधीची समानता दिली आहे त्या संविधानाचा आदर प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे. हा देश धर्मनिरपेक्ष रहावा म्हणून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.  अंनिस जिल्हा कार्य अध्यक्ष  गोवळकर म्हणाले की, आपला देश हा संविधानानुसार चालतो. हे संविधान जन मानसात रुजवण्याची जबाबदारी व संविधान प्रमाणे सर्व जनतेला न्याय देण्याची जबाबदारी ही शासकीय कार्यालयातील अधिकारी  व कर्मचारी यांची आहे.त्यामुळे आजचा दिवस हा सर्वांसाठी महत्वाचा आहे.


---------------------------------------------------------------

भारतीय संविधान दिनाच्या तमाम भारत वासियांना हार्दिक शुभेच्छा

आपले भारतीय संविधान
कवी-सुरज साठे

जातीवादाच्या, धर्मांधांच्या विळख्यातून बाहेर काढून मानवतावादाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते ते आपले भारतीय संविधान....

नाही इथे कोणी उच्च नाही कोणी नीच या धर्मनिरपेक्ष भारतात मानवच आहे सर्वात श्रेष्ठ अशी ग्वाही देतं ते आपले भारतीय संविधान....

गुलामगिरीच्या तोडुनी बेड्या स्वाभिमानाने जगायला शिकवून स्वातंत्र्याची मशाल पेटवून भारतीय नागरिकाच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असते ते आपले भारतीय संविधान....

समाजवादी, लोकशाही भारतात समता, समानता, बंधुता आणि न्याय यांच पालन करून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देते ते आपले भारतीय संविधान....

२९ राज्ये, ९ केंद्रशासित प्रदेश, ६४० जिल्हे, ५४५० तालुके यांना एकत्र बांधून ठेवून प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करते ते आपले भारतीय संविधान....

१३५कोटी जनतेच्या भारत देशात प्रजेला राजाचे स्थान देऊन राजासारखं जगायला शिकवून मत अधिकाराने आपला सेवक निवडून देण्याचा अधिकार देते ते आपले भारतीय संविधान....

राष्ट्रपती, पंतप्रधान असो वा रस्त्यावरचा भिकारी दोहोंना समान न्याय एवढच काय देवालाही न्याय ज्याच्या कडून घ्यावा लागतो ते आपले भारतीय संविधान....

 घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरां पुढे महा सत्ताधारी राष्ट्राचा घटनाकार जेफरसन ही झुकतो. ही दुनिया ज्या घटनेपुढे नतमस्तक होते ते आपले भारतीय संविधान....

कवी-सुरज साठे             9370626619
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे       जन्मभूमी वाटेगावPost a Comment

0 Comments