धम्मदीप दिनदर्शिका सन२०२१चे प्रकाशन


 समाजासाठी वयाची पाच वर्षे मी रस्त्यावर झोळी घेऊन उतरीन- अशोक दुधसागरे
शहापूर
 धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर यांचे विद्यमाने रविवारी धम्मदीप हॉल, गोठेघर येथे भारतीय संविधान गौरव दिन व धम्मदीप दिनदर्शिका सन२०२१ प्रकाशन समारंभ कार्यक्रमाचे करण्यात आले होते. 
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले उपस्थित होते तर शहापूर उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. मनोहर बनसोडे, धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था माजी अध्यक्ष आत्माराम घायवट, भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका अध्यक्ष भरत घनघाव, सरचिटणीस बाळाराम वाढविंदे, शहापूर शहर अध्यक्ष मारुती चन्ने, पत्रकार संजय भालेराव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था अध्यक्ष अशोक दुधसागरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना तसेच भारतीय संविधान ग्रंथाचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते धम्मदीप दिनदर्शिका सन२०२१ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. विष्णू फुलझेले यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेवर व संविधानातील विविध कलमांची सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष गौतम उबाळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे सरचिटणीस भगवान घायवट तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव माधव भोईर यांनी यांनी पार पाडले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था संचालक व कार्यकारिणी यांनी विशेष मेहनत घेतली. 

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात  धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था अध्यक्ष अशोक दुधसागरे  म्हणाले, /धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे मुख्य उद्दिष्ट संविधानाच्या संवर्धनासाठी काम करणे त्या अनुषंगाने सन २००६ पासून संविधान संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. २०१० साली सुरू केलेले बुद्धविहाराचे थांबलेले काम ही कार्यकारणी आणि सभासद तसेच संपूर्ण समाज हे लवकरच पूर्ण करतील. समाजासाठी वयाची पाच वर्षे मी रस्त्यावर झोळी घेऊन उतरीन 
संविधानाचा कार्यक्रम करून भागणार नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की "शासनकर्ती जमत व्हा"  शासनकर्ती जमात होण्यासाठी दोन्ही बाजू बधितल्या पाहिजेत नुसत्या लीडरशिप करून चालणार नाही. प्रशासनामध्ये जी धोरणे ठरविली जातात त्या धोरणाचे भाग देखील आम्ही झालो पाहिजेत त्यासाठी संस्थेने यूपीएससी आणि एमपीएससी चे अभ्यासकेंद्र चालू वर्षांपासून सुरू करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगत संघटना मोठी झाली असून चार-पाच जण वगळता सर्वच ५०-५५ वर्षांपुढील असल्याने संस्थेत जास्तीत जास्त महिला व तरुणांना देणार असे सांगत वयाची पाच वर्षे माझ्यासाठी रोजच आहेत. पाच वर्षांमध्ये मला जे करणे शक्य आहे ते मी समाजासाठी वयाची पाच वर्षे मी रस्त्यावर झोळी घेऊन उतरीन अशीच भावना संस्थेच्या सभासदांची देखील आहे. असे सांगत अशोक दुधसागरे यांनी दान पारमितेचे महत्व यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA