संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देण्याची गरज- डॉ. माकणीकर

 सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- डॉ. माकणीकर

मुंबई - संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी समविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा यासाठी सर्वांनी सरकारकडे आग्रह धरावा,  26 नोव्हेम्बर संविधान दिवसाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी व सविधान दिवस कसा साजरा करावा यासाठी एक आचारसंहिता निर्माण करावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले. 

 सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे या मागणीसाठी मागील 14 वर्षांपासून प्रयत्नशील असून तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे. सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून संविधान जनजागृती व साक्षरता अभियान अंतर्गत  50 हजार भारतीय संविधान पुस्तिका लग्न समारंभ तर विविध कार्यक्रमाप्रसंगी वाटप करून त्याचा प्रचार करत आहोत. तसेच शिवाय 1 लाखाच्या वर संविधान उद्देशिका फ्रेम मोफत वितरित करण्यात आल्या आहेत.  398 आजी माजी लोकप्रतिनिधींना समविधान पुस्तिका व निवेदने  देण्यात आली आहेत. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करून सदर मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडू असा विश्वास दाखवला. तसेच  भदंत शिलबोधी, कॅप्टन श्रावण गायकवाड राजेश पिल्ले व अन्य शिस्तमंडल याप्रकरणी महामहिम राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे माहितीही डॉ माकणीकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA