देश आपला नेहमीच ऋणी राहील

घटना कशीही असली तरी पण तिला राबवून घेणारे जर चांगले असतील तर ती घटना उत्तम ठरेल. परंतु जर घटना कितीही उत्तम असली पण तिला राबविणारे जर नालायक असतील तर ती घटना  देशासाठी कुचकामी ठरणार असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. 
26 नोव्हेंबर हा संविधान गौरव दिन म्हणून जाहीर झाला असला तरी आजही ज्यांच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेतून या देशाची घटना साकार झाली, जे भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले, ज्यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून भारताला जगात सन्मानाचे स्थान मिळवून दिले आणि भारताला राज्यकारभाराचे स्वयंभू सुत्र बहाल केले ते या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला प्रत्येकजण का विसरतो एक कोडे अद्यापही उलगडले गेले नाही. एखाद्या देशाला आपला सर्वांगीण विकास करून घ्यावयाचा असेल तर त्या देशाला खरेखुरे नेतृत्व करणारा विचारवंत जन्माला यावा लागतो व त्याचे शास्त्राrय विचार पचविणारा तेवढ्याच जाणिवेचा जनसमाज निर्माण व्हावा लागतो. प्रथमत: त्यांच्या मनात राष्ट्रभिमानाचे बीज रोवावे लागतात. तेव्हा कुठे एक राष्ट्र म्हणून त्या राष्ट्राची खऱया अर्थाने निर्मिती होते. थॉमस जेफर्ससन यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा व पुढे अमेरिकेची राज्यघटना लिहिली तेव्हा अमेरिकन लोकांनी त्यांचे कौतुक केलेच पण त्यांचे भव्य स्मारक उभारले आणि कृतज्ञापूर्वक तेथील लोक त्यांची आठवण जागी ठेवतात. थॉमसपेन या विचारवंतांनी फ्रान्समधील लोकांना  जी नवीन समाज निर्मितीची दिशा दिली, तेव्हा फ्रान्स लोकांनी शेकडो एकर जमीन व भव्य राजप्रसाद बांधून घेतला आणि फ्रेंचांनी त्यांची फ्रेंच लोकसभेवर निवड करून ठेवली जोसेफ स्टॅलिन हा रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता. स्टॅलिनच्या शास्त्राrय विचारांनी व तत्त्वांनी आम रशियन जनतेचे हित अभिप्रेत होते. तेथील लोकांनी त्यांची अध्यक्षपदावर निवड करून ठेवली. अमेरिकेतील प्रख्यात निग्रोनेता बुकर टी वॉशिंग्टन,अब्राहम लिंकन आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वामुळे  आज निग्रो समाजात एक नवनिर्मिती दिसून आली आहे. तेवढ्याच आदर्शाने तेथील जनतेने आपल्या कर्तृत्वाची पराकाष्ठा केली. संविधानातील प्रमुख अंगे 1) सांसदीय लोकशाही 2)मुलभूत हक्क आणि त्यासाठी असलेली न्यायालयीन यंत्रणा 3) मार्गदर्शक तत्वे 4) केंद्र - राज्य संबंध 5) घटना दुरूस्ती ही आहेत. त्यात 395 कलमे व 8 परिशिष्टांचा समावेश आहे. तसेच संविधानात केंद्र शासनाबरोबर राज्यांच्या घटनाही समाविष्ट आहेत. शिवाय अल्पसंख्याक, अनुसूचित जाती वगैरे बाबत तरतुदीही कराव्या लागल्या. 

 घटना कशीही असली तरी पण तिला राबवून घेणारे जर चांगले असतील तर ती घटना उत्तम ठरेल. परंतु जर घटना कितीही उत्तम असली पण तिला राबविणारे जर नालायक असतील तर ती घटना  देशासाठी कुचकामी ठरणार असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. आणि स्वातंत्र्यानंतरच्या या काळात त्याची पुरेपूर प्रचिती आपल्याला पहावयास मिळत आहे. ज्या संविधानाने संपूर्ण देश एकसंघ?ठेवण्याचे काम केले त्या संविधानाला बदलण्याची सुरुवात 2006 साली सुरुवात झाली आणि आज केवळ त्याचे वरील वेष्ठण तसेच ठेवून आतील पाने बदलण्याचे काम सुरु आहे. मग कामगार कायदे असोत वा शेतकरी बील असो वा अन्य काही.  

 हा देश राज्यघटनेच्या माध्यमातून विकासाच्या गतीने प्रगतीशील करणे आणि न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मुल्यांची प्रतिष्ठापणा करण्यासाठी सिध्द होणे हेच संविधानकर्त्याला अपेक्षीत होते. मात्र सद्यस्थितीत भारतीय राज्यघटनेची तत्वे उदात्त असली तरी त्याला कर्तव्याची जोड नाही. त्यामुळे हा देश दिवसेंदिवस विनाशाच्या गर्तेत जातांना दिसत आहे. कारण राज्यकर्त्यांनी अजुनही मनुच्या कायद्याचे जोखड आपल्या खांद्यावरून खाली उतरविले नाही. त्यामुळे ओठातून जरी भारतीय राज्यघटनेचा त्यांनी स्वीकार केला असला तरी त्यांच्या पोटात मात्र मनुचा कायदा जीवंत आहे. त्यामुळेच राज्यघटनेची मानवी मूल्ये ही पताका प्रमाणे शोभावी तशी दिसतात. याची प्रचिती स्वातंत्र्योत्तर काळात जशी झाली तशीच आजही येत आहे. ज्या मनुच्या कायद्याने हा देश कित्येकदा पारंतंत्र्य झाला तोच कायदा तरूण पिढीने स्वीकारला तर पुन्हा हा देश आपले स्वातंत्र्य गमावून बसल्याशिवाय राहणार नाही. ही धोक्याची सूचना डॉ. बाबासाहे आंबेडकरांनी यापूर्वीच दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते की, जोवर सामाजिक आणि आर्थिक विषमता कायदा आहे तोवर  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हे सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले. त्यांनी संविधानात कृतिशील आणि कल्याणकारी शासनाला  सामाजिक, आर्तिक, न्यायावर समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था यांची पुर्नबांधणी करावयाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला दिलेली ही देणगी फार मोलाची आहे. मात्र भारतीय जनतेला त्याची कधीही महती कळलेली नाही किंवा राज्यकर्त्यांनी ती कळू दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत. त्यांच्या या उपकारांची फेड कुणालाही करता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारात राहून प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. केवळ संविधानाच्या प्रत्येक कलमात सर्वसामान्य जनतेचे तळागाळातील माणसाचे हित जपलेले असतानाही आज केवळ धार्मिकतेची झापडे बांधून प्रत्येक जण तडपडत आहे. आणि अजाणतेपणाने संविधानालाच दोष देण्याचे कामही करत आहे. काही अपवाद सोडले तर प्रत्येक भारतीय व्यक्तीमध्ये बाबासाहेबांच्या प्रती आणि संविधानप्रती कृतज्ञतेचा अभावच आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad